‘३७०रद्द’नंतरचे काश्मीर खोरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2020   
Total Views |

kashmir valley_1 &nb


मागील वर्षी भारतीय संसदेच्या माध्यमातून काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रद्द करण्यात आले. त्याची नुकतीच वर्षपूर्ती झाली. त्या निमित्ताने काश्मीर खोर्‍यातील सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: पाकिस्तानच्या काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंध आला असल्याचे समोर येत आहे.



मागील अनेक वर्षांमध्ये किंबहुना आजही थोड्याफार प्रमाणात जगाच्या पाठीवर काश्मीर खोरे हा चर्चेचा विषय ठरत आहे. काश्मीर म्हटले की तेथील नैसर्गिक सौंदर्याबरोबरच समोर येते ते पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद. काश्मीरला ‘कलम ३७०’ मुळे विशेष राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. याचा गैरफायदा तेथील हुर्रियत नेते आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी आजवर भरभरून घेतला. हे काश्मीरमधील आजवरच्या अतिरेकी कारवाईच्या माध्यमातून आपण सगळ्यांनीच अनुभवले आहे. मात्र, मागील वर्षी भारतीय संसदेच्या माध्यमातून काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रद्द करण्यात आले. त्याची नुकतीच वर्षपूर्ती झाली. त्या निमित्ताने काश्मीर खोर्‍यातील सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: पाकिस्तानच्या काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंध आला असल्याचे समोर येत आहे. एकेकाळी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर असा नवीन चेहरा काश्मीरमध्ये उदयास आलेला नाही.



‘अनुच्छेद ३७०’ रद्द झाल्यानंतर आणि प्रशासन पूर्णपणे भारतामध्ये विलीन झाल्याच्या एक वर्षानंतरच्या बदलांची अनेक उदाहरणे काश्मीर खोर्‍यात दिसून येत आहेत. विकासाची चर्चा आणि त्यासाठी तळमळ ऐकू येत आहे. परंतु, सर्वात मोठी दृश्यमानता ही सुरक्षा आघाडीवर आहे. ३० वर्षांमध्ये प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये अधिकाधिक अतिरेकी नष्ट होत आहेत, तेथे नवीन दहशतवाद्यांची भरती होत नाही. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी, शस्त्रे आणि पैशांची पुरवठा साखळी तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला गेला. असे म्हटले जाऊ शकते की, दहशतीची समर्थन यंत्रणा कोलमडत आहे. गेल्या दशकात जमात-ए-इस्लामी आणि हुर्रियत कॉन्फरन्सवर बंदी घालण्यासाठी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांना साथ देणार्‍यांवर ईडी व एनआयएने आपला लगाम कसला आहे. काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांच्या मते, संपूर्ण वर्षभरात काहीशेच्या घरात दहशतवादी काश्मिरात मारले गेले आहेत. ज्यामध्ये ३०विदेशी दहशतवादी आणि ३९ टॉप कमांडर आहेत. ते म्हणाले की, आजपर्यंत खोर्‍यात सक्रिय असलेल्या सर्व दहशतवादी संघटना विरक्त झाल्या आहेत. यावर्षी घुसखोरीत एकूण २६दहशतवादी यशस्वी झाले होते, जे पाकिस्तानकडून गेल्या वर्षात ७५टक्के वाढले आहे. गेल्या वर्षी घुसखोरीदरम्यान सीमेवर एकही सामना झाला नव्हता. परंतु, सीमेवर सुरक्षा दलांची दक्षता दर्शविणार्‍या यावर्षी अर्धा डझन चकमकी झाल्या आहेत.


सीमेवरील सुरक्षा दलांच्या सक्रियतेचा परिणाम केवळ हल्ल्यांच्या तीव्रतेवरच झाला नाही तर अतिरेक्यांना शस्त्रपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. पंजाबमधून त्यांना ड्रोन घेऊन शस्त्रे पुरवण्यासाठी पाकिस्तान सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, पण यश फार कमी मिळत आहे. दिलबाग सिंग यांच्या म्हणण्यानुसार कधीकधी येथील तरुण बुरहान वानीसारख्या दहशतवाद्याचा फोटो त्यांच्या खिशात ठेवत असत. सर्वसाधारणपणे हिंसाचारानंतर २ हजार, ६००हून अधिक घटना घडल्या ज्यामध्ये तीन हजार पोलीस कर्मचारी जखमी झाले आणि ७०हून अधिक सामान्य लोक मृत्यू पावले. परंतु, ५ऑगस्ट २०१९नंतर ११५०पेक्षा कमी हिंसक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. ‘कलम ३७०’ रद्द करणे हा जरी भारतीय संसदेचा निर्णय असला आणि त्याचे परिणाम हे भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरसंदर्भात असले तरी, त्याचे जागतिक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर या घटनेचे महत्त्व निश्चितच दखल घेण्याजोगे आहे. ‘९/११ ’ च्या दहशदवादी हल्ल्यानंतर अमेरिका जगात दहशतवादी नावाची संकल्पना आहे, हे मान्य करू लागला. हा इतिहास आहे. ‘कलम ३७०’ रद्द करणे हा ऐतिहासिक निर्णय आहे. देशाने देशाच्या सुरक्षेचा, सार्वभौमत्वाचा आणि एकतेचा विचार करून घेतलेला निर्णय हा जागतिक पातळीवर कशाप्रकारे शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. सध्या काश्मीरमधील ‘कलम 370’ रद्द केल्याने जगाच्या एका मोठ्या चर्चित क्षेत्रात शांतता नांदत आहे. याची जाणीव आतातरी पाक समर्थक चीनसारख्या राष्ट्रांना होणे नक्कीच आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@