मुंबईकरांसाठीही काही करा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2020   
Total Views |

bmc_1  H x W: 0




महापौर म्हणतात की, सीबाआयच्या टीमने मुंबईत येण्यापूर्वी परवानगी घेतली नाही तर त्यांना ‘क्वारंटाईन’ केले जाईल. किती ते नियमांचे पालन, किती ती कर्तव्य तत्परता! आता यावर काही नेहमीचे नतद्रष्ट लोक म्हणत आहेत की, ही कर्तव्य तत्परता सामान्य मुंबईकरांसाठी का दाखवली जात नाही. राज्याबाहेरून आलेला नागरिक सोडा, इथे मुंबईत कोरोनाग्रस्तांचे वाहन सुविधेविना, उपचार सुविधेविना तडफडून मृत्यू झाले, घरात, अगदी ‘क्वारंटाईन सेंटर’मध्येही कोरोनाग्रस्त व्यक्ती वारली. त्याच्या घरातले संबंधित यंत्रणेला संपर्क साधून थकले की आमच्या रूग्णाला न्या, आमची काहीतरी सोय करा, पण त्यांच्याबाबतीत इतकी तत्परता दाखवली गेली नाही. आता इतकी कर्तव्यपरायणता?



सध्या किशोरी पेडणेकर मुंंबईच्या महापौर चर्चेत आहेत. काय म्हणता महापौरांनी मुंबई शहरातल्या सगळ्या समस्या सोडवल्या की काय? रस्त्यावर कुठे खड्डे नाहीत. कुठे पाणी भरले नाही. महानगरपालिकेच्या दवाखान्यात स्वच्छता आणि तत्परता आहे की विचारण्याची सोय नाही. मुंबईमधील गटारी-नाले स्वच्छ झाले आहेत. पाणी टंचाई छे, अजिबात नाही. थोडक्यात मुंबईची महानगरपालिका क्र. १ वर काम करत आहे म्हणून महापौर चर्चेत आहेत का? छे! या मुंबई शहरासाठी देवदुर्लभ असणार्‍या सुविधा कितीही महत्त्वाच्या असल्या तरी स्वप्नच आहेत. त्यामुळे मुंबईच्या महापौर यासाठी चर्चेत कशा असतील? महानगरपालिका केवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती, ही कोंबडी अंडेही देते, पण अंडे विकता येत नाही आणि खाताही येत नाही, अशी परिस्थिती कोरोनाने केली आहे.


महापौर का बरं चर्चेत असाव्यात? महापौरांनी असे काय केले? किंवा त्या जे काही करतात ते स्वत: करतात का? सुशांत सिंहच्या खुनाचा तपास करायला बिहारचे विनय तिवारी आले. त्यांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले. यावर सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले. पण आताही महापौर म्हणतात की, सीबाआयच्या टीमने मुंबईत येण्यापूर्वी परवानगी घेतली नाही तर त्यांना ‘क्वारंटाईन’ केले जाईल. किती ते नियमांचे पालन, किती ती कर्तव्य तत्परता! आता यावर काही नेहमीचे नतद्रष्ट लोक म्हणत आहेत की, ही कर्तव्य तत्परता सामान्य मुंबईकरांसाठी का दाखवली जात नाही. राज्याबाहेरून आलेला नागरिक सोडा, इथे मुंबईत कोरोनाग्रस्तांचे वाहन सुविधेविना, उपचार सुविधेविना तडफडून मृत्यू झाले, घरात, अगदी ‘क्वारंटाईन सेंटर’मध्येही कोरोनाग्रस्त व्यक्ती वारली. त्याच्या घरातले संबंधित यंत्रणेला संपर्क साधून थकले की आमच्या रूग्णाला न्या, आमची काहीतरी सोय करा, पण त्यांच्याबाबतीत इतकी तत्परता दाखवली गेली नाही. आता इतकी कर्तव्यपरायणता? अर्थात, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. त्यामुळे या कर्तव्यपरायणेतेचे इतिकर्तव्य काय असेल यावर महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. महापौर आणि संबंधितांनी कृपया लक्षात घ्यावे, पण सामान्य मुंबईकरांचे लक्षात कोण घेतो?



महाराष्ट्रविरोध : व्याख्या काय?



या सर्व प्रकरणाची कुणीतरी बसून पटकथा लिहिली आहे. त्यानुसार घटना घडत आहेत. महाराष्ट्राविरोधातील हे षड्यंत्र आहे, महाराष्ट्राला घेरले जात आहे, असे ते द्रष्टे नेते आकांताने म्हणाले. तेव्हा वाटले, की काय प्रकरण आहे? महाराष्ट्राला कोणत्या घटनेमध्ये घेरले जात आहे? महाराष्ट्रनामक राज्याने असे काय घोर-गंभीर गुन्हेगारी कृत्य केले की महाराष्ट्राच्या विरोधात कुणीतरी षड्यंत्र करत आहे? हे विधान कशासंदर्भातले असावे? सध्या महाराष्ट्रात कोरोना आणि त्यामुळे असलेला ‘लॉकडाऊन’ आणि त्या ‘लॉकडाऊन’मुळे उद्भवणार्‍या जगण्या-मरण्याच्या समस्या, यामुळे तर महाराष्ट्राच्या विरोधात कुणी षड्यंत्र करत नाही ना? किंवा सध्या जे भीतीची आणि कुणीच मायबाप राज्य सरकार अस्तित्वात नसल्याची भयंकर भीती महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाली, त्याबद्दल तर हे विधान नसेल ना! कारण, कोरोना, नंतर चक्रीवादळ आणि त्यानंतर मुंबईतली पावसामुळे पूरसदृश्य स्थिती या सर्व परिस्थितीमध्ये राज्यातील जनता हवालदिल होती.


तर असो. अशी ही महाराष्ट्राची कधी न झालेली स्थिती पाहूनच दूरदृष्टी असणारे संजय म्हणाले की, महाराष्ट्रविरोधी षड्यंत्र रचले जात आहे? पण छे! ते तर या सर्व गोष्टींबद्दल असे म्हणालेलेच नाहीत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू-आत्महत्या-हत्या प्रकरण सीबीआयकडे जाणार म्हटल्यावर त्यांना महाराष्ट्राच्या विरोधात कटकारस्थान रचल्याचे वाटले का? सीबीआय तपास करून खुन्याला शोधणार आहे. सुशांत सिंह राजपूतचा खून झालाच असेल आणि त्याचा जो कोणी खुनी असेल, त्याला सजा व्हायलाच हवी. त्या खुनाचा तपास करणे किंवा त्या खुन्याला सजा व्हावी अशी व्यवस्था सीबीआय करणार असेल तर ते महाराष्ट्र विरोधातले षड्यंत्र कसे? जो कोणी खुनी असेल त्याचे समर्थन महाराष्ट्र करतो का? शक्यच नाही. महाराष्ट्र न्यायाच्या आणि सत्याच्या बाजूने आहे. न्यायपूर्ण सत्तेसाठी रामराज्य चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचा कायदा लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच महाराष्ट्रातले. या महाराष्ट्रात एखाद्या हत्येचा तपास करण्याची तरतूद होत असेल तर तो महाराष्ट्रद्रोह कसा? खुन्याविरोधात कारवाई म्हणजे महाराष्ट्रविरोधात कारवाई आहे का?




@@AUTHORINFO_V1@@