१६ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला राम मंदिर भूमिपूजन सोहळा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2020
Total Views |
bhumipujan_1  H


दूरदर्शन, प्रसार भारतीकडून ट्विट करत माहिती!


मुंबई : ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक दिनाचे साक्षीदार होण्यासाठी सगळेच जण आपापल्या घरी टीव्हीसमोर बसले होते. अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन आणि पायाभरणीचा सोहळा तब्बल १६ कोटीहून अधिक लोकांनी थेट पाहिला आहे. प्रसार भारतीच्या प्राथमिक अंदाजानुसार हा आकडा जाहीर करण्यात आला. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेनपती यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. भूमिपूजन दिनी सकाळी १०.४५ ते दुपारी २च्या दरम्यानचा हा आकडा आहे. अयोध्येतील हा ऐतिहासिक सोहळा जवळपास २०० वाहिन्यांवरून थेट प्रसारित करण्यात आला होता.







५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत १२ वाजून ४४ मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन केले. यासाठी केवळ ३२ सेकंदचा शुभ मुहूर्त होता. तत्पूर्वी ३१ वर्षे जुन्या ९ शिलांचे पूजन केले. यावेळी चांदीच्या विटांची पूजा करण्यात आली. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची निर्मिती सुरू होणार आहे.


@@AUTHORINFO_V1@@