नरेंद्र मोदी हेच देशाचे भावी पंतप्रधान असावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2020
Total Views |

PMO narendra modi _1 



नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला आता सव्वा वर्ष पूर्ण होत आले आहे. दरम्यानच्या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. मात्र गेल्या काही काळापासून देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने मोदी सरकारसमोर गंभीर आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या कामगिरीचा आढावा घेणारा सर्वात मोठा सर्वे समोर आला आहे. या सर्वेनुसार देशातील ७८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही पंतप्रधान मोदींनी आघाडी घेतली आहे.



सर्वेक्षण काय होते?

आज तक इंडिया टुडेसाठी 'कार्वी इनसाइड्स लिमिटेड'या संस्थेने केलेल्या 'मूड ऑफ द नेशन पोल'मध्ये सहभाग घेतलेल्या जवळपास दोन तृतियांश लोक मोदींनी आर्थिक पेच प्रसंगातही समस्येवर विजय मिळविण्याच्या कार्यावर खूष आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी देशातील ७८ टक्के लोकांनी मोदींचे काम खूप चांगले किंवा चांगले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या कामगिरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ३० टक्के लोकां मोदींची कामगिरी उत्कृष्ट तर ४८ टक्के लोकांनी चांगली असल्याचे सांगितले. १७ टक्के लोकांच्या म्हण्यानुसार मोदींची कामगिरी सामान्य असल्याचे तर पाच टक्के लोकांनी वाईट असल्याचे सांगितले.


india today repoert_1&nbs


स्पर्धेत कोणत्या नेत्यांची नावे ?

दरम्यान, पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही कुठल्याही नेत्याला मोदींच्या आसपासही जाता आले नाही. या सर्वेनुसार नरेंद्र मोदी हे पुढील पंतप्रधान म्हणून लोकप्रिय आहेत. नरेंद्र मोदी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असले पाहिजेत, असे ६६ टक्के लोकांनी या सर्वेमध्ये सांगितले. तर पंतप्रधानपदाच्या शर्यतील काँग्रेसचे नेते राहुल गांधी दुसऱ्या स्थानी राहिले. सर्वेमधील आठ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दिली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भावी पंतप्रधान म्हणून पाच टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर ४ टक्के लोकांनी अमित शाह यांच्या नावाला पसंती दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही प्रत्येकी तीन टक्के लोकांनी भावी पंतप्रधान म्हणून पसंती मिळाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना प्रत्येकी दोन टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.


india today repoert_1&nbs

इंडिया टुडेच्या सर्वेक्षणात काय निकाल आला समोर ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी उत्कृष्ट की चांगली असल्याचे ७८ % लोकांनी सांगितले. हे रेटिंग पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ सर्वाधिक आहे. इंडिया टुडेचे हे सर्वेक्षण अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा कोरोनाचे संकट, आर्थिक संकट तसेच चीनबरोबर सीमावाद यामुळे भारताला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

@@AUTHORINFO_V1@@