अमेरिकेतून टिकटॉक, व्हीचॅटसह चायनीज अ‍ॅप्स अखेर हद्दपार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |
Donald trump_1  

ट्रम्प प्रशासनाकडून व्यवहार बंद करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि व्हीचॅटसारख्या चायनीज अ‍ॅप्स वर बंदी घालण्याच्या आदेशावर आज स्वाक्षर्‍या केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थोच्या रिपोर्ट्सनुसार, चीनी अ‍ॅपमुळे अमेरिकेची 'सुरक्षा' धोक्यात आल्याचे सांगत त्यांनी ही कारवाई केली आहे. त्यानुसार पुढील ४५ दिवसांत टिकटॉक अ‍ॅपची मालकी कंपनी बाईटडान्स आणि व्हीचॅट यांच्यासोबत आता अमेरिकेमध्ये कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत.


अमेरिकेच्या सिनेटमध्ये गुरूवारी सरकारी अधिकाऱ्यांच्या फोनमधून टिकटॉक काढून टाकण्यासाठी मतदान घेण्यात आले होते. व्हाईट हाऊसनेही टिकटॉक हे सुरक्षित नसल्याचे म्हणत त्याच्यावर कारवाई करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे तिथे हा ठराव मंजुर झाला आहे. आता हा ठराव डेमोक्रॅट्सचे वर्चस्व असणार्‍या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिवसमोर जाणार आहे.


सध्या अमेरिकेमध्ये मायक्रोसॉफ्ट ही कंपनी टिकटॉक अ‍ॅप विकत घेण्याच्या शर्यतीमध्ये असल्याचे वृत्तदेखील समोर येत आहे. दरम्यान ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या ४५ दिवसांच्या मुदतीमध्ये तो व्यवहार होऊ शकतो. युएसएमध्ये टिकटॉक सोबतच आता व्हीचॅट हा मेसेजिंग अ‍ॅपदेखील बंद करण्याचा निर्णय झाला आहे.
@@AUTHORINFO_V1@@