ईडीसमोर हजर होण्यास रिया चक्रवर्तीचा नकार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |
ED_1  H x W: 0

सुप्रीम कोर्टाची सुनावणी संपेपर्यंत इतर चौकशी न करण्याची रियाची मागणी!


मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता सीबीआय आणि ईडी यांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणात ईडीने रिया चक्रवर्तीला ७ ऑगस्टला चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, रियाने अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपेपर्यंत तिची इतर चौकशी होऊ नये, अशी मागणी रियाने केली आहे. रियाला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ईडीचे समन्स मिळाले असून, अभिनेत्रीने ईडीला त्याच्या उत्तरादाखल नकार पाठविल्याचे समजते आहे. दरम्यान, ईडीने रियाचे अपील नाकारत, तिला आजच हजर राहण्यास सांगितल्याची माहिती समोर येत आहे.


सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता सीबीआय चौकशी करीत आहे. तत्पूर्वी, मुंबई पोलिसांच्या तपासादरम्यान ईडीनेदेखील तपास सुरू केला आहे. रिया आणि तिचा भाऊ शौविक सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यातून पैशांचा गैरव्यवहार करत असल्याचा ईडीचा संशय आहे. ईडीने रियाचा मुंबई, खार परिसरातील फ्लॅट ताब्यात घेतला आहे. दरम्यान, ईडीने रियाबरोबर तिच्या भावाची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीही यात सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.




@@AUTHORINFO_V1@@