'मला नव्हे तर सुशांतसिंग प्रकरणाच्या तपासाला क्वॉरंटाईन केल होतं'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |

SP vinay tiwari_1 &n




मुंबई :
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी या प्रकरणात तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना लीड करण्यासाठी मुंबईत आलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना मागील जवळपास सात दिवसांपासून मुंबईत क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेमुळे सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप विनय तिवारी यांनी केला.


विनय तिवारी यांचे मुंबईतील क्वॉरंटाईन संपवण्यासाठी गुरुवारी याचिका देखील दाखल करण्यात आली होती. अखेर आज सकाळी त्यांचा क्वॉरंटाईनचा कालावधी संपवण्यात आला आणि संध्याकाळी पाचच्या फ्लाईटने ते बिहारच्या दिशेने रवाना झाले. याबाबत मुंबई महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याने मला भेटून माझी क्वॉरंटाइनमधून मुक्तता करण्यात आल्याचे सांगिले नाही. मला महापालिकेने फक्त मेसेज पाठवून ही माहिती दिली. त्यामुळे मी आता पाटण्याला जायला निघालो आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप झाला होता. बिहार पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने करू नये म्हणूनच तिवारी यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता.




बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही तिवारी यांना महाराष्ट्रात चांगली वागणूक मिळाली नसल्याची खंत व्यक्त करत हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. तर बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पालिकेला तिवारी यांची क्वॉरंटाइनमधून मुक्तता करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आज सकाळी तिवारी यांची पालिकेने क्वॉरंटाइनमधून मुक्तता केली होती. सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी बिहारमध्ये सुशांत आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले होते. मात्र मुंबईत येताच तिवारी यांना मुंबई महापालिकेने १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन केले. शिवाय क्वॉरंटाइनबाबतचे सरकारी नियमही दाखविण्यात आले होते. त्यामुळे बिहरा विरुद्ध मुंबई पोलीस असा संघर्ष निर्माण होऊन मोठा गदारोळ झाला होता. याचे राजकीय पडसादही उमटण्यास सुरुवात झाली होती.
@@AUTHORINFO_V1@@