मुंबईत रंगणार पंचवीस थरांची अनोखी दहीहंडी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |
dahihandi_1  H

मराठी व्यावसायिक वाद्यवृंद कलाकार साकारणार ‘पंचवीस थरांची दहीहंडी’


मुंबई : अवघे विश्व कोरोनामुळे त्रस्त झाले आहे. सगळेच व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोना महामारीमुळे मार्च, एप्रिल, मे हा उत्सव, जत्रा-यात्रा, विवाह सोहळ्याचा सिझन मराठी वाद्यवृंदातील लोककलाकार कार्यक्रमापासून पूर्णपणे वंचित राहिले होते. साठवणुकीतले पैसे वापरून अनेक कलाकार आपली गुजराण करत आहेत. या सगळ्यातही कलाकार मात्र चेहऱ्यावर हसू ठेवून दुसऱ्यांना आनंद देण्याचे काम करत आहे. म्हणूनच मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ व कलानिधी समिती या संस्थेच्यावतीने कलाकार ‘एक अनोखी दहीहंडी’ साजरी करणार आहेत.


लॉकडाऊन काळ ही पर्यावरण संवर्धनाची उत्तम संधी असल्यामुळे संस्थेच्या माध्यमातून वाद्यवृंदातील मराठी कलाकार, ज्येष्ठ वृक्षतज्ञ विक्रम यांदेजी यांच्या मार्गदर्शनाखाली दीर्घकाळ टिकणारी, डेरेदार सावली देणाऱ्या भारतीय प्रजातीच्या वृक्षांचे 'एकाच वेळी, एकाच दिवशी पंचवीस ठिकाणी वृक्षारोपण' करण्यात येणार आहे.


बुधवारी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता, पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी कन्नमवार नगर उड्डाणपुलाजवळून या कार्याचा शुभारंभ होणार आहे. २५ टीम्सकडून विविध विभागात सकाळी ८ ते १२ यावेळेत तब्बल १००० वृक्ष लावले जाणार आहेत. या उपक्रमानंतर मुंबई आणि उपनगरातील समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत आठ ठिकाणांची स्वच्छता केली जाणार आहे. तसेच, १५ ऑगस्टच्या निमित्ताने कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या वाद्यवृंद कलाकारांना अन्नधान्य वाटप केले जाणार आहे.


कोरोनाच्या कठीण काळातही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या 'पंचवीस थरांच्या दहीहंडी'चे सध्या कौतुक होत आहे. सामजिक कार्याने सण साजरा करत, कलाकारांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम या उपक्रमातून केले जाणार आहे.



@@AUTHORINFO_V1@@