सोने-चांदीच्या भावात ऐतिहासिक वाढ ! पहा किंमत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |
Gold Rates_1  H
 



नवी दिल्ली : जागतिक बाजारात अनिश्चितचेचे सावट असल्याने सोने-चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे. याच कारणामुळे सोने आणि चांदी दररोज नवनवा उच्चांक गाठत आहे, आंतरराष्ट्रीय स्तरासह देशांतर्गत बाजारपेठांमध्येही सोन्याचांदीचा नवा विक्रम पहायला मिळत आहे. सोन्याने शुक्रवारी सर्वात मोठा विक्रम नोंदवला आहे.
'
 
 
मल्टी कमोडिटी एक्सचेंजला (एमसीएक्स) शुक्रवारी वायदेपूर्तीवेळी सोने प्रतितोळा ५५ हजार ५०६ रुपये प्रतिदहा ग्रॅमवर खुले झाले. काही वेळातच ६८५ इतक्या वाढीसह ५६ हजार १९१ रुपये प्रतिदहा ग्रॅमवर पोहोचले. हा विक्रम जास्तवेळ टीकला नाही. त्यानंतर काहीवेळातच सोन्याचा दर ५६ हजारांवरून पुन्हा खाली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत तो पुन्हाा ५५ हजार ७५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता. गुरुवारी सोने ५५ हजार ८४५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले.
 
 
 
जागतिक बाजारपेठेत सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून चांदीच्या वायदे बाजारातही उच्चांक नोंदवण्यात आला आहे. एमसीएक्सवर शुक्रवारी चांदीमध्ये ७५ हजार ६३ रुपये प्रति किलो चांदीचा दर नोंदवण्यात आला. काही वेळातच चांदीचा दर २ हजार ८८६ रुपयांनी वधारत ७७ हजार ९४९ रुपयांवर पोहोचला. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक आहे. गुरुवारी चांदी ७६ हजार ५२ रुपयांवर बंद झाली.
 
 
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या मागणीमुळे सोने २ हजार ६० डॉलर प्रतिऔस इतके पोहोचले. चांदी ३० डॉलर प्रति औस रुपयांवर पहोचली. २००६नंतर पहिल्यांदाच सोने चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली आहे. एक औसमध्ये २८ ग्रॅम वजन असते. या पुढेही भाववाढ अशीच सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. बाजारातील वाढती मागणी आणि कोरोनाचा प्रभाव गुंतवणूकदारांनी सोने चांदी हाच पर्याय निवडला आहे. डॉलरमध्ये आलेली कमजोरी सोने चांदीच्या भाववाढीचे कारण बनले आहेत.



@@AUTHORINFO_V1@@