प्रसिद्ध सेलिब्रेटी फिटनेस ट्रेनर पारस नयालचे निधन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |
Paras_1  H x W:

टायगर श्रॉफने वाहिली श्रद्धांजली!


मुंबई : संपूर्ण जगासाठी सर्वाधिक धोकादायक ठरलेल्या कोरोना विषाणूने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. तसेच हे वर्ष सिनेसृष्टीतील अनेकांसाठी नुकसानदायक ठरले आहे. यावर्षी अनेक छोट्या मोठ्या कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. यातच सिनेसृष्टीतील प्रसिद्ध फिटनेस ट्रेनस पारस नयाल याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. ६ ऑगस्ट रोजी त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पारस नयाल याच्या निधनाची बातमी समजताच सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयशा श्रॉफ यांनी ट्विटरच्या माध्यमातून पारासला श्रद्धांजली वाहली आहे.






पारस नयाल हा श्रॉफ कुटुंबियांच्या अधिक जवळ होता. पारस एमएमए मॅट्रिक्स येथे फिटनेस ट्रेनर होता. पारस हा गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यांपासून एका ऑटो इम्यून डिजीज या आजाराने ग्रस्त होता. हा आजार थेट शरीरावर हल्ला करतो. या आजाराशी लढत पारस याने पराभव न स्वीकारता फिटनेसच्या जगात मोठी प्रसिद्धी मिळवली. मात्र, गुरुवारी त्याची प्राणज्योत मावळली. एमएमए मॅट्रिक्सच्या इंस्टाग्राम पेजवरून पारस यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.


@@AUTHORINFO_V1@@