राज्यात रामाला विरोध यापेक्षा वेगळी मोगलाई काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2020
Total Views |

ayodhya_1  H x


राममंदिर भूमिपूजनाचा जल्लोष साजरा करणाऱ्यांवर कारवाई का ? भाजपचा राज्यसरकारला सवाल



मुंबई :
काळ ५ ऑगस्ट रोजी राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत संपन्न झाला. देशभरातच नव्हे तर जगातील कानोकोपऱ्यात असणाऱ्या हिंदूंनी हा सोहळा एखाद्या सणासारखा साजरा केला. मात्र राज्यात जल्लोष साजरा करणाऱ्या भाजप तसेच हिंदुत्ववादी नेत्यांवर कारवाई करण्यात आली. अनेक जिल्ह्यात पोलिसांनी जल्लोष साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली. यामुळे 'राज्यात मोगलाई आलीय का ?' असा सवाल भाजपने ठाकरे सरकारला केला आहे. महाराष्ट्र भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेत हा सवाल उपस्थित केला.


दरम्यान, औरंगाबाद, अहमदनगर तसेच नाशिक व राज्यातील इतर भागात पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी भगवे झेंडे जप्त केले, श्री रामाच्या प्रतिमा जप्त केल्या तसेच शेकडो कार्यकर्त्यांवर राज्यात करण्यात आली. नाशिकमध्ये काळाराम मंदिर परिसरात बॅरिकेट लावून प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. याठिकाणी साधू संतांना नोटीस देण्यात आल्या. परभणीत व पुणे येथे मिठाई वाटू दिली नाही. कराड, अकलूज याठिकाणी दमदाटी करण्यात आली. काही भागात १२ ते २ यावेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याच सर्व घटनांवरून केशव उपाध्ये यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला.


यावर राज्यसरकारला सवाल करत केशव उपाध्ये म्हणाले, "देशभरात जल्लोषाचे वातावरण होते. ५०० वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्यानंतरचा तो सुवर्णक्षण साजरा करावा हीच भावना प्रत्येकाच्या मनात होती. लोकांनी दिवाळी साजरी केली. मात्र असं सगळं वातावरण असताना महाराष्ट्रात मात्र मोगलाई आलीय का ? असे चित्र महाराष्ट्रात होत. कोरोना काळ असताना सर्व भाजप नेत्यांनी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करूनच हा आनंद साजरा करावं या सूचना आधीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या होत्या.तरीही जिल्ह्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना जल्लोष साजरा करण्यावर सरकारकडून बंधन आणली गेली. कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात आली. जल्लोष साजरा करूनच द्यायचा नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती का ?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणतात, "शिवसेनेचा खरा चेहरा यानिमित्ताने लोकांसमोर आला. एकीकडे म्हणायचं आम्ही हिंदुत्वापासून दूर नाही मात्र त्याचवेळी रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळ्याचा आनंद महाराष्ट्रात साजरा केला जाऊ नये अशाप्रकारची व्यवस्था करायची अशाप्रकारचे आदेश द्यायचे हा दुट्टपीपणा यानिमित्ताने समोर आला. म्हणून ठाकरे सरकारच्या या मोगलाईचा आम्ही निषेध करतो."असे म्हणत त्यांनी राज्यसरकारच्या दडपशाहीचा निषेध केला.
@@AUTHORINFO_V1@@