अखेर आयपीएल २०२० मधून विवोची माघार ; करार मोडला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2020
Total Views |

bcci_1  H x W:
 
 
नवी दिल्ली : भारत- चीनसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयने विवो या चायना कंपनीसोबत झालेला करार मोडला आहे. याबद्दल आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक जाहीर करून माहिती दिली. आयपीएलच्या १३व्या हंगामाला हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर विवो कंपनी प्रायोजक असल्यामुळे बीसीसीआयही भूमिका वादात सापडली होती. सोशल मिडीयावर याबद्दल रोषही व्यक्त करण्यात आला होता. आता विवोचा पत्ता कट झाल्यानंतर कोणती भारतीय कंपनी प्रायोजक म्हणून पुढे येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरण आहे.
 
 
बीसीसीआय आणि विवो कंपनीमध्ये २०१८ला ५ वर्षांचा करार झाला होता. या स्पर्धेच्या प्रायोजनासाठी विवोने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला विवो कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती. मात्र, भारत – चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहीरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी विवोसोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
 
 
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “गव्हर्निंग काऊन्सीलच्या बैठकीनंतर आम्ही आणि विवो च्या अधिकाऱ्यांनी वेगळी चर्चा केली. या चर्चेअंती एक वर्षासाठी विवो कंपनी आयपीएलचे प्रायोजक बनणार नाही हे ठरवण्यात आले. दोन्ही बाजूंनी सामोपचाराने यावर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. या वर्षाच्या मोबदल्यात विवो कंपनीसोबतचा करार २०२३ पर्यंत वाढवता येईल का? याचा विचार बीसीसीआय करणार आहे.”
 
 
@@AUTHORINFO_V1@@