फडणवीस सरकारच्या काळातील बळीराजा चेतना योजना रद्द !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2020
Total Views |

UT DF _1  H x W
 
 
 
 

शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय


मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी लागू करण्यात आलेली महत्वाची योजना ठाकरे सरकारने रद्द केली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणात घट झालेली नसून, ही योजना अपयशी ठरल्याचा निष्कर्ष ठाकरे सरकारने काढला आहे. मदत व पूर्नवसन विभागातर्फे या संदर्भात एक परिपत्रक काढण्यात आले आहे.
 
राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटांमुळे खचून गेलेला आहे. या शेतकऱ्याला पुन्हा उभारी मिळावी, आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हावे, तसेच आर्थिक सबलीकरण होण्यासाठी प्रेरणामिळावी या दृष्टीने ही योजना आखण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून ८० कोटी रक्कम शेतकऱ्यांसाठी खर्च करण्यात आली होती. मानसिकदृटय़ा खचलेला शेकतरी आत्महत्येकडे वळतो. अशा परिस्थितीतून त्यांना बाहेर काढणे, यासाठी बळीराजा चेतना योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा पथदर्शी प्रकल्प म्हणून २४ जुलै २०१५ पासून उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्ह्यात ही योजना लागू केली होती. मात्र, कोरोनाचे संकट डोक्यावर असताना निसर्ग वादळ, टोळधाड, लॉ़कडाऊन या सारखी संकटे डोक्यावर असताना ही योजना रद्द करण्यात आली आहे.
यापूर्वी ठाकरे सरकारने फडणवीस सरकारतर्फे स्थापन करणाऱ्यात आलेले आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना रद्द केली होती. शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. मात्र, ठाकरे सरकारने या निर्णयालाही स्थगिती देत योजना रद्द केली. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयश आल्याचा ठपका अभ्यासाअंती या योजनेवर ठेवल्यानंतर ही योजना अखेर रद्द करण्यात आली आहे.
 


@@AUTHORINFO_V1@@