कोकणात घरोघरी गुढ्या उभारून रामउत्सव साजरा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |

ram mandir _1  


परशुरामाच्या भूमीत रामउत्सव 


मुंबई - आज अयोध्येमध्ये पार पडत असलेल्या राम मंदिराचे भव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकणातही रामउत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. काही गावांमध्ये पहाटे घरोघरी गुढ्या उभारुन, अंगणात रांगोळ्या काढून हा आनंदोत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने कोकणालाही अयोध्येचा रंग चढल्याचे चित्र दिसत आहे. 

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. रामउत्सवाचा हा रंग महाराष्ट्राला चढलेला दिसत आहे. पशुरामाची भूमी म्हणून ओळख असलेल्या कोकणातील वातावरणही राममय झाले आहे. कोकणावासीयांनी आज पहाटे गुढ्या उभारून अंगणात रांगोळ्या काढून हा उत्सव साजरा केला. मंडणगड, दापोली तालुक्यातील गावांमध्ये ग्रामस्थांनी आपल्या घराच्या बाहेर गुढ्या उभारल्या आहेत. वेळास गावात प्रत्येक घराच्या बाहेर गुढी उभारल्याचे दिसून येत आहे. लोकांनी घराच्या बाहेर रांगोळ्या काढून त्यावर दिवे लावले आहेत. 

@@AUTHORINFO_V1@@