समस्त हिंदूंच्या भावनांना पूर्ण करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |

Yogi Adityanath _1 &





अयोध्या :
राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी रा. स्व. संघ सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल हे मंचावर उपस्थित होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, "१३५ कोटी भारतवासियांसाठी आणि जगातील अनेक हिंदूंच्या भावनांना पूर्ण करणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत."






पुढे ते म्हणाले, "भगवान श्री राम यांच्या पवित्र भूमीवर ५०० वर्षांपासून बहुप्रतिक्षित, दीर्घ संघर्ष आणि अध्यात्मिक संकल्पाच्या स्मृतीदिनी भूमिपूजनानिमित्त सात पवित्र पुरींपैकी एक असलेल्या अवध पुरीमध्ये आदरणीय पंतप्रधानांचे मी स्वागत करतो. भारताच्या लोकशाही मूल्ये, न्यायव्यवस्था व कार्यकारिणी यांच्या सामर्थ्याने शांततापूर्ण पद्धतीने, लोकशाही पद्धतीने आणि घटनात्मक मान्यतेने समस्या कशा सोडवता येतील याचे उदाहरण माननीय पंतप्रधानांनी जगातील सर्व शक्तींना दाखवून दिले आहे."

आपल्या कित्येक पिढ्या या क्षणाची प्रतीक्षा करत गेल्या आहे. अनेक महापुरुष, पूज्य संतांनी आपले प्राण अर्पण केले. त्याच इच्छेने आपण आपल्या डोळ्यांनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराचे बांधकाम पाहणार आहोत. या क्षणाचे साक्षीदार होणार आहोत , असेही ते म्हणाले.




@@AUTHORINFO_V1@@