भारतीय संस्कृतीतील हा सुवर्णक्षण : सरसंघचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |
Dr Mohanji Bhagawat_1&nbs
 

 
अयोध्या : राम मंदिर निर्माण होत असल्याचा क्षण हा भारतीय संस्कृतीतील प्रत्येकासाठी सुवर्णक्षण आहे, इथे उपस्थित असलेले आणि राम मंदिर निर्माण लढ्यात योगदान असणाऱ्या प्रत्येकासाठी हा सुवर्णक्षण आहे, असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. अयोध्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त उपस्थितांना संबोधन करताना ते बोलत होते.
 
 
  
बाळासाहेब देवरसजी यांचे स्मरण करून त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, " प.पू. सरसंघचालक बाळासाहेब यांनी म्हटल्यानुसार, २० ते ३० वर्षे तपस्या करावी लागेल. ही वीस वर्षांची तपश्चर्या आज फळाला आली आहे, संकल्प पूर्ती झाली आहे. आत्मनिर्भर भारतासाठी अध्यात्मिकदृष्ट्या राम जन्मभूमिपूजन महत्वाचे पाऊल आहे. भारतीय संस्कृती जी विश्वात प्रसिद्ध आहे, वसुधैव् कुटूंबकम् या ब्रिदावर चालणाऱ्या संस्कृतीतील एक सुवर्णक्षण आहे. हा आनंदाचा क्षण आहे, एक स्पुरण आहे, उत्साह आहे, जीवन जगण्याची शिकवण देणारा आजचा दिवस आहे.
 
 
 
कोरोनाचे संकट संपूर्ण विश्वावर असताना सारे हतबल आहेत, सर्व दरवाजे बंद झाले आहेत, कुठे मार्ग सापडतो आहे का हे प्रत्येकजण पाहतो आहे, भारताने तो मार्ग जगाला दाखवला आहे. राम मंदिराचे निर्माण होईल, प्रत्येकावर दायित्व आहे, आपल्यावरही जबाबदारी आहे, प्रत्येकाला स्वतःच्या मनात एक अयोध्या तयार करण्याची गरज आहे. मंदिर तयार होण्यापूर्वी मनमंदिर बनण्याची गरज आहे.
 
 
 
काम, क्रोथ, लोभ, माया यासारख्या सर्व दोषांपासून मुक्त असलेले आपले हृदय बनले पाहिजे. जगातील सर्व मोह मायेपासून दूर असलेले मन आणि संपूर्ण जग आपलंसं करण्याची ताकद जेव्हा येईल तेव्हा आपल्या मनातही राम बसेल. या मंगलमय क्षणी मी सर्वांचे आभार मानतो, माझ्या मनात जे विचार आहे ते मी तुमच्यासमोर ठेवले सर्वांचा मी आभारी आहे, असेही ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी सत्यगोपालदासजी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही त्यांनी आभार मानले.


@@AUTHORINFO_V1@@