भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी पारंपरिक पेहरावात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |


pmo_1  H x W: 0



अयोध्या 
: पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित झाले आहेत. पंतप्रधान मोदी सहसा कुर्ता-पायजामा या पेहरावात असतात मात्र आज भूमिपूजनात सामील होण्यासाठी त्यांनी विशेष पारंपारिक कुर्ता व धोती परिधान केला आहे. थोड्याच वेळात भूमिपूजन सोहळा सुरु होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान सोनेरी रंगाचा कुर्ता आणि धोती या पोशाखात दिसत आहेत. गळ्याभोवती भरतकाम केलेली पांढऱ्या रंगाची शाल आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विमानतळावर त्यांचे स्वागत केले.





भूमिपूजनाच्या मुख्य सोहळ्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी आज १२ :१५ ला रामजन्मभूमीवर भूमिपूजन करतील. विशेष गोष्ट अशी आहे की, भगवान श्री राम यांचा जन्म ज्या मुहूर्तावर येथे झाला होता आणि त्याच मुहूर्तावर आज मंदिर भूमीसाठी पूजन केले जाणार आहे. राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तिमत्त्व यावेळी असणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@