राम मंदिर आधुनिक भारताचे प्रतीक बनेल : राष्ट्रपती कोविंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |

kovind_1  H x W



राम मंदिर भूमिपूजनानंतर राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या भावना!

नवी दिल्ली : राम मंदिर भूमिपूजनानंतर राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, भगवान राम यांचे मंदिर न्यायप्रक्रियेनुसार जनतेच्या उत्साहाने आणि सामाजिक समरसतेच्या पाठिंब्याने तयार केले जात आहे आणि ते आधुनिक भारताचे प्रतीक बनेल. राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट करत समस्त देशाला या ऐतिहासिक क्षणाच्या शुभेच्छा दिल्या. “राम-मंदिर बांधकामाच्या उद्घाटनाबद्दल सर्वांचे अभिनंदन! मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राम यांचे मंदिर न्यायप्रक्रियेनुसार जनतेच्या उत्साहाने आणि सामाजिक समरसतेच्या पाठिंब्याने बांधले जात आहे." असे ट्विट करत ते म्हणाले," माझा विश्वास आहे, की मंदिर परिसर रामराज्याच्या आदर्शांवर आधारित आधुनिक भारताचे प्रतीक असेल."







विशेष म्हणजे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन करून मंदिराचा पायाभरणी केली. राम मंदिराच्या बांधकामाचा समावेश भाजपच्या जाहीरनाम्यात करण्यात आला होता आणि गेल्या तीन दशकांपासून हा मुद्दा त्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होता. अनेक दशके जुन्या मुद्यावर तोडगा काढत सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होते.




@@AUTHORINFO_V1@@