स्वप्न साकारतंय याच समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर : केशव उपाध्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |
keshav upadhye_1 &nb


अयोध्या रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न


मुंबई : अयोध्या रामजन्मभूमी भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला. कोरोनामुळे ठराविक आमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. देशवासियांसाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. या सोहळ्याचे वर्णन करत महाराष्ट्र भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली. ट्विट करत केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, अयोध्या भूमिपूजन कार्यक्रम पहातोय. मन तिथे कधीच पोहचल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी संकल्प करत आहेत. इथे बसलेले सगळे भावुक झालेत. अनेक वर्षांच स्वप्न साकारतय याच समाधान सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आहे. जय श्रीराम ! असे म्हणत त्यांनी या सोहळ्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
@@AUTHORINFO_V1@@