'जलेगा तो बर्नोलही चलेगा' : 'ती' जाहिरात आली चर्चेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |

burnol_1  H x W


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भूमिपूजन केले. दिवसभर याबद्दलचे विविध ट्रेंड्स सोशल मीडियावर चर्चेत होते. मात्र, आज तक या वृत्तवाहिनीवर भूमिपूजन सुरू असताना प्रसिद्ध झालेली जाहिरात दिवसभरातील चर्चेचा विषय ठरला आहे. अयोध्येत भूमिपूजन सर्व मर्यादा आणि सोशल डिस्टंसिंग पाळत पूर्ण झाले. मोदींच्या आगमनापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत थेट प्रक्षेपण सुरू होते.


 
 
 
दरम्यान, आज तक या वृत्तवाहिनीवर डिस्प्ले जाहिरात प्रदर्शित झाली. याचा एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला. उदारमतवादी, लिबरल आणि डाव्या संघटनांना या मिम्सद्वारे लक्ष करण्यात आले आहे. 'जलेगा तो बर्नोलही चलेगा', अशी टीका करण्यात आली आहे. तसेच योग्य ठिकाणी जाहीरात दाखवली, अशा प्रतिक्रीयाही अनेकांनी दिल्या. बरनॉल हे शरीरावर जळलेल्या भागावर मलम म्हणून वापरले जाते.
 
 
 
 
मात्र, ही जाहिरात दाखवून भूमिपूजनामुळे ज्यांचा जळफळाट झाला आहे, त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.शेअर बाजारातही बर्नॉलची चर्चा होती. बर्नॉल उत्पादन तयार करणाऱ्या मोरेपेन लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीचा शेअर गेल्या पाच दिवसांत दहा अंकानी वधारला. दिवसभर या शेअरमध्ये मोठे चढउतार दिसून आले. दिवसअखेर तो २४.६० अंकांवर बंद झाला.
@@AUTHORINFO_V1@@