जिल्हाधिकाऱ्यांची बंदी झुगारून गोदातीरावर गंगा आरती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |
Uddhav Thackeray _1 
 


नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम जन्मभूमी उत्सव साजरा करू नका, रांगोळ्या काढू नका, पाच माणसेही एका ठिकाणी जमू नका, अशा नोटीसा ठिकठिकाणी राज्य सरकारच्या आदेशानुसार भाजप नेत्यांना बजावण्यात आल्या होत्या. नाशिकमध्ये गोदातीरावर राम कुंडावरही कुठलाही उत्सव साजरा केला जाणार नाही, त्यावर बंदी घातली जाईल, असे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले होते. दरम्यान हा प्रकार समजल्यानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी रामकुंडावर जाऊन गोदातीरावर गंगा आरती केली. 
 
राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यापूर्वी त्यांनी आरती पूर्ण केली. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करत आम्ही सर्व नियम पाळून पूजा केली असल्याचे त्या म्हणाल्या. पूजेवर बंदी घालणाऱ्या प्रशासनाला त्यांनी जाब विचारला त्याशिवाय ठाकरे सरकारलाही खडेबोल सुनावले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशावरचे संकट टळण्यासाठी आम्ही प्रार्थना करत असताना अशा प्रकारे दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
त्या म्हणाल्या, "देशात सर्व रामभक्तांच्या आयुष्यातील सुवर्णदिन आज असताना ज्यांनी या राम कुंडावर येऊन पूजा आरती करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्या सर्वांना मंगळवारी रात्री ११ वाजेपर्यंत प्रशासनाने जाऊन नोटीशी बजावल्या, रांगोळी काढू नका, फुलांची आरास करू नका, अशा प्रकारे उत्सव साजरा करण्यापासून रोखण्यात आले. शिवसेनेचे सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या चरणी लीन झाले आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली. आम्ही कुठलाही कायदा न मोडता, सर्व नियमांचे पालन करत आरती केली आहे, जर नियम मोडले असे त्यांना वाटत असेल तर खुशाल गुन्हे दाखल करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.



@@AUTHORINFO_V1@@