भारतात पुन्हा रामराज्याची स्थापना! : कंगना राणावत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |
kangana_1  H x

राम मंदिर भूमिपूजनानंतर व्यक्त केल्या भावना!

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत १२ वाजून ४४ मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन केले. यासाठी केवळ ३२ सेकंदचा शुभ मुहूर्त होता. तत्पूर्वी ३१ वर्षे जुन्या ९ शिलांचे पूजन केले. यावेळी चांदीच्या विटांची पूजा करण्यात आली. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची निर्मिती सुरू होणार आहे. यामुळे सगळीकडे उत्सवाचे वातावरण आहे. बॉलिवूडमध्येही आनंदाला उधाण आले आहे. बॉलीवूडची मर्दानी अर्थात कंगना राणावतने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊन आपला आनंद व्यक्त केला आहे.







कंगनाच्यावतीने तिच्या टीमने २ फोटो पोस्ट करत कंगनाची प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचवली आहे. ही फोटो ट्विट करत, ‘दोन वर्षांतील ५०० वर्षांच्या प्रवासाचे वर्णन करणारी छायाचित्रे. प्रेम, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण असा प्रवास, सभ्यतेचा प्रवास जो परमात्मा श्री रामांच्या वैभवाची गाथा सांगत आहे. जय श्री राम ..’ असे म्हणत तिने आता पुन्हा एकदा भारतात रामराज्य सुरु होणार असल्याचे म्हंटले आहे.



@@AUTHORINFO_V1@@