अयोध्येत बाबरी होती आणि राहणार, इशांअल्लाह : ओवैसी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |
Asaduddin Owaisi_1 &
 
 
 
 
 
नवी दिल्ली : अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करणार आहेत. भव्य राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पहाटेच एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. "बाबरी मशीद होती आणि राहील, इशांअल्लाह", असे वादग्रस्त ट्विट त्यांनी केले आहे. या सह वादग्रस्त ढाँच्याचा फोटोही शेअर केला आहे. 
 
 
 
९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर प्रकरणी निकाल जाहीर केला आहे. आपल्या निकालात सर्वोच्च न्यायालयात जन्मभूमीची जागा रामललाला सोपवण्यात आली आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने मशिदीसाठी पाच एकर जागा देण्याचेही आदेश दिले आहेत. तरीही आपल्या वादग्रस्त विधानासाठी ओळखले जाणारे ओवैसी यांनी आज पहाटे पहाटे हे ट्विट केले आहे.
 
 
 
 
 
 
यापूर्वी त्यांनी प्रियांका गांधी यांना लक्ष्य करत राम मंदिर प्रश्नावरून घेरले होके. प्रियांका गांधी यांनी एक पत्र लिहून राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त राष्ट्रीय एकतेचे दर्शन व्हावे, असे मत व्यक्त केले होते. या पत्रात त्यांनी २३ वेळा रामनाम लिहीले होते. त्यावरही ओवैसी यांनी आक्षेप घेतला. "आनंद आहे, की आता त्या खोटा आव आणत नाही आहेत. हिंदूत्वच्या विचारधारेला आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, मग बंधुत्वाच्या मुद्द्यावर खोटा आव का आणतात", असाही प्रश्न त्यांनी विचारला होता.
 
 
 
अयोध्येत आज १२ वाजून ४० मिनिटांनी भूमिपूजन कार्यक्रम
 
अयोध्येत १२ वाजून ४० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनासाठी पहाटेपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल सरू आहे. सहा वाजल्यापासूनच वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विमानाने लखनऊला पोहोचणार आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@