‘राम काज करिबे को आतुर...!’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |
Shriram_1  H x

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन


नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) : देशभरातील सश्रद्ध हिंदू समाजाने सुमारे ५०० वर्षांपासून उराशी बाळगलेले अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्याचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवतजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह राजकीय-सामाजिक क्षेत्रातील निवडक मान्यवर, संतसमुदाय आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने भारतीयत्वाचाच गौरव होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. यानिमित्ताने भारतीयत्वाचाच गौरव होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत असून अवघ्या हिंदू समाजाच्या आनंदाचे वर्णन आता ‘राम काज करिबे को आतुर...’ अशा शब्दांत करणेच योग्य ठरेल.


अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी हिंदू समाजाने शेकडो वर्षांचा लढा दिला होता. गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने अखेर श्रीरामजन्मभूमीवरील हिंदूंचा हक्क मान्य करीत ट्रस्ट स्थापन करण्याचे आणि मंदिर उभारणीचे आदेश दिले होते. त्यानुसार महंत नृत्यगोपालदास यांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टची स्थापपना करण्यात आली. त्यानंतर बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन होत असून येत्या तीन वर्षांमध्ये मंदिराची उभारणी पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. साधारणपणे दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान मोदी भूमिपूजनास प्रारंभ करतील, हा विधी १२ वाजून ४४ मिनिटांनी पूर्ण होईल. यानंतर पंतप्रधान मोदी देशवासीयांना संबोधित करतील.


यावेळी व्यासपीठावर रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास उपस्थित असणार आहेत. सोहळ्यासाठी १७५ अतिथींना निमंत्रण देण्यात आले असून त्यापैकी १३५ अतिथी हे विविध आध्यात्मिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे संत आहेत. कार्यक्रमाचे यजमानपद सलिल सिंघल यांना देण्यात आले आहे. ते श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे अर्ध्वयु आणि विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल याचे पुतणे आहेत.



असा असेल पंतप्रधानांचा कार्यक्रम
पंतप्रधान मोदी सकाळी साधारणपणे ९ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास दिल्ली येथून उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊसाठी रवाना होतील. तेथे ते १० वाजून ३५ मिनिटांनी म्हणजे तासाभरात पोहोचतील, त्यानंतर १० वाजून ४० मिनिटांना पंतप्रधान अयोध्येसाठी रवाना होतील आणि ११.३०च्या सुमारास अयोध्येत पोहोचतील. तेथे प्रथम हनुमानगढी येथे पूजा करतील. रामललाचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते पारिजात वृक्षाचे रोपण केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष भूमिपूजनाच्या विधीस १२ वाजून ३७ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि साधारणपणे १२ वाजून ४४ मिनिटांना विधी पूर्ण होईल. विधी पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी देशवासीयांना संबोधित करतील.



ram mandoir_1  



असे असेल भव्य श्रीराम मंदिर !

भूमिपूजनानंतर साधारणपणे तीन ते साडेतीन वर्षांमध्ये मंदिराची उभारणी पूर्ण होणार आहे. मंदिराच्या जुन्या आराखड्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता तीन मजली मंदिराच्या शिखराची उंची वाढवून आता १६१ फूट करण्यात आली असून घुमटांची संख्या ३ वरून ५ करण्यात आली आहे. मंदिराच्या उंचीमध्ये ३३ फुटांची वाढ करून एक मजला वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वी मंदिराची लांबी २६८ फुट ५ इंच होती, ती आता २८० ते ३०० फुटांपर्यंत होणार आहे. रामललाचे गर्भगृहाच्यावर शिखर असेल. मंदिराच्या घुमटांखाली सिंहद्वार, नृत्यमंडप, रंगमंडप असेल, तेथे भाविकांच्या बसण्याची तसेच धार्मिक कार्यक्रम करण्याची सोय असेल. भूमिपूजन सोहळाच्या पूर्वसंध्येस ट्रस्टतर्फे प्रस्तावित श्रीराममंदिराची छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत.



काँग्रेसकडून भगवीकरणाचे ढोंग

राम मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसी नेत्यांनी मंगळवारी सर्वांना चक्रावून सोडणारी विधाने केली. राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी एका पत्रकाद्वारे राम मंदिर राष्ट्रीय एकतेचे दर्शन व्हावे, असा संदेश त्यांनी दिला. २१ ओळींमध्ये त्यांनी २७० शब्द लिहिले आहेत. त्यात त्यांनी २३ वेळा रामाचा उल्लेख केला आहे. राम मंदिराबद्दलचे ट्विटही त्यांनी शुद्ध हिंदीत लिहिले.


दुसरीकडे भगव्या रंगाची वस्त्र परिधान करत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुंदरकांडाचा पाठ घेतला. त्यांनी काही चांदीच्या विटादेखील अयोध्येसाठी पाठविल्या. कमलनाथ यांनी ट्विटरवर प्रोफाईल फोटोही बदलला आहे. त्यात त्रिपुंड तिलक लावला असून भगवे वस्त्र परिधान केले आहे. त्यांच्या आणखी एका फोटोमध्ये भगवी वस्त्र परिधाने केल्याचे दिसत आहे. कमलनाथ यांनी दरकांड पाठ केला. त्यांनी राम मंदिर निर्माणाचे स्वागत केले. कमलनाथ यांनी ११ चांदीच्या विटा अयोध्येला पाठवणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसला चांगलेच फटकारले आहे. राम मंदिराबद्दलचे प्रियांकांचे पत्र सर्वात आधी कपिल सिब्बल यांना पाठवा, तसेच जे लोक राम एक काल्पनिक व्यक्तीरेखा आहे, असे म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पाठवा, असा टोला लगावला आहे. तर हिंदुत्ववादी संघटनांनी काँग्रेस नेत्यांचे हे एक ढोंग असल्याचे म्हटले आहे.







@@AUTHORINFO_V1@@