२७ वर्ष चप्पल न घालणाऱ्या कारसेवकाचे स्वप्न अखेर पूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |

Kolhapur_1  H x
 
कोल्हापूर : बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्यामध्ये राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिये गावामधील एका कारसेवकाने केलेल्या संकल्पाचे फळ त्यांना मिळाले. राम मंदिरासाठी तब्बल २७ वर्षे पायात चप्पल न घालणाऱ्या कारसेवक निवास पाटील यांचा संकल्प भूमी पूजनाने पूर्ण झाला आहे. त्यांच्या या अनोख्या रामभक्तीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
 
 
कोल्हापूरजवळ शिये गावातील कारसेवक निवास पाटील यांच्या अनोख्या राम भक्तीचे दर्शन सर्वांना झाले. आयोध्येत राम मंदिर होणार नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा त्यांनी संकल्प केला होता. तब्बल २७ वर्ष अनवाणी पायाने फिरत होते. मंदिराचा कलश रोहन झाल्यानंतरच पायात चप्पल घालण्याचा त्यांनी निर्धार केला होता. ते १९९२च्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. बुधवारी त्यांनी राम मंदिर भूमिपूजननिमित्ताने घरातच प्रभू रामचंद्राच्या प्रतिमे पूजन केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@