प्रियांकांनी घेतले २३ वेळा रामनाम : कमलनाथांनी नेसले भगवे वस्त्र !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |

Kamalnath and Priyanka Ga

नवी दिल्ली : राम मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसी नेत्यांची चक्रावून सोडणारी वक्तवे येत आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमाला प्रियांका गांधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एका पत्रकाद्वारे राम मंदिर राष्ट्रीय एकतेचे दर्शन व्हावे, असा संदेश त्यांनी दिला. २१ ओळींमध्ये त्यांनी २७० शब्द लिहीले आहेत. त्यात त्यांनी २३ वेळा रामाचा उल्लेख केला आहे. राम मंदिराबद्दलचे ट्विट शुद्ध हिंदीत लिहीले आहे.





दुसरीकडे भगव्या रंगाची वस्त्र परिधान करत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुंदरकाण्डाचा पाठ घेतले. चांदीच्या वीटा अयोध्याला रवाना केल्या आहेत. कमलनाथ यांनी ट्विटरवर प्रोफाईल फोटोही बदलला आहे. त्यात त्रिपुंड तिलक लावला आहे, भगवे वस्त्र परिधान केले आहे. त्यांच्या आणखी एका फोटोमध्ये भगवी वस्त्र परिधाने केल्याचे दिसत आहे. कमलनाथ यांनी दरकाण्ड पाठ केला. त्यांनी राम मंदिर निर्माणाचे स्वागत केले. कमलनाथ यांनी ११ चांदीच्या वीटा अयोध्येला पाठवणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसला चांगलेच फटकारले आहे. राम मंदिराबद्दलचे प्रियांकांचे पत्र सर्वात आधी कपिल सिब्बल यांना पाठवा, तसेच जे लोक राम एक काल्पनिक व्यक्तीरेखा आहे, असे म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पाठवा, असा टोला लगावला आहे.



@@AUTHORINFO_V1@@