दलालांना पोसण्यासाठी ई-पास ठेवलाय काय ? : निलेश राणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |

nilesh rane_1  



मुंबई :
गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशातच वेळेत ई पास मिळत नसल्याने त्यात खासगी दलाल ई पाससाठी शुल्क आकारत असल्याने विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी राज्यसरकारने ई पासच नाटक बंद करावं असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.


ट्विट करत त्यांनी हा निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "कोकणात जाण्यासाठी लोकांना खूप त्रास होतोय. राज्य सरकारने ई-पासचं नाटक बंद करावं, काही गरज नाही पासची. दलालांना पोसण्यासाठी पास ठेवलाय काय? क्वाॅरंटाईन किती दिवसाचा असेल हे पण सरकारने अजून सांगितलेलं नाही. कोकणी माणूस मागच्या ४ महिन्यांपासून जे भोगतोय ते कधी विसरणार नाही."






दरम्यान, काल मनसेचे नेते मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी बोगस ई-पास मिळवून देणाऱ्या दलालाशी संभाषणाची ऑडिओ क्लिपच ट्विटरवर शेअर केली आहे. त्यामुळे ई-पासच्या नावाखाली कोकणवासियांची काही दलालांमार्फत फसवणूक होत असल्याचे उघड झालेले आहे. यात मनसेचा एक कार्यकर्ता ई पाससाठी दलालाशी बोलताना दिसत आहे. रत्नागिरीच्या ई पाससाठी दलाल दोन हजार रुपये मागत असल्याचे क्लिपमधून ऐकायला येत आहे. शिवाय, हा पास नाशिकमधून काढला जाईल, असेही तो सांगतोय. ही ऑडिओ क्लिप टाकून संदीप देशपांडे यांनी सरकारच्या भोंगळ कारभारावर हल्लाबोल केला आहे. परप्रांतीय मजुरांना फुकट सोडणारे राज्यातील ठाकरे सरकार राज्यातील जनतेला दलालांच्या मार्फत लुटत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.



@@AUTHORINFO_V1@@