मुंबई पालिका आणि पोलिसांना वेड लागलंय : संजय निरुपम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |
sanjay nirupam_1 &nb


सुशांत आत्महत्येप्रकरणी संजय निरुपम यांचा राज्यसरकारवर हल्लाबोल!


मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांनी पाटणा शहर एसपी विनय तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची टीम मुंबईला पाठवली आहे.


सुशांतच्या बॅंक खात्यातून १५ कोटी रुपयांची रक्कम परस्पर वळती केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने रियावर केला आहे.सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता बिहार पोलीस देखील मुंबईत दाखल झाले आहेत.याप्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन केले आहे. बिहार पोलिसांनी तिवारी यांना जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप केला गेला आहे.


यावरून काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी मुंबई पोलीस आणि पालिकेला चांगलेच सुनावले आहेत. पालिका आणि पोलिसांना वेड लागले आहे, असे म्हणत संजय निरुपम यांनी हल्लाबोल केला आहे. ‘सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. चौकशी कशी होणार?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा. तिवारी यांची सुटका करून त्यांना तपास कामात मदत करावी. नाही तर मुंबई पोलिसांवरील संशय आणखी वाढेल’, असं ट्विट निरुपम यांनी केले आहे.






@@AUTHORINFO_V1@@