श्रीराममंदिर भूमिपूजनाची उत्कंठा शिगेला ; अयोध्येत आज दीपोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |

ayodhya_1  H x



अयोध्या :
उद्या अयोध्येत होणाऱ्या राममंदिर भूमिपूजनाचा जल्लोष संपूर्ण देशभरात अनुभवायला मिळतो आहे. मुख्यमंत्री योगींच्या आवाहनावरून मथुरा, काशी, चित्रकूट, प्रयागराज, नैमिषारण्य आणि गोरखपूर या तीर्थक्षेत्रांमध्ये आजपासून अखंड कीर्तन आणि रामायण पठण सुरू झाले आहे. आज अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.


शरयू नदीदेखील नेहमीच्या प्रवाहापेक्षा अधिक ७० सेमी वर प्रवाही आहे. अशीच उत्सुकता आज अयोध्येमधील लोकांमध्ये भूमिपूजनाविषयी आहे. रामनामाची धून गात आज घरोघरी प्रभू श्रीरामांना अभिवादन केले जात आहे. संपूर्ण अयोध्यानगरी भूमिपूजनाच्या शुभ मुहूर्तामध्ये सामील होण्यास सज्ज आहे. कोरोनामुळे लोकांना या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाहीये, परंतु घराच्या अंगणात रांगोळी आणि छतावर भगवा ध्वज लावून नागरिक या सोहळ्यात सहभाग नोंदवित आहेत.श्रीराम जन्मस्थळापासून २-४ किलोमीटर अंतरावर राहणा-या लोकांनी टीव्हीद्वारे महोत्सवात सामील होण्याची योजनादेखील बनविली आहे. ५ ऑगस्टचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसे उत्साहवर्धक वातावरणात अयोध्येतील मंदिरे गजबजू लागली आहेत. संपूर्ण अयोध्यामध्ये भूमिपूजनाच्या दिवशी ५५ हजार किलो देशी तूपापासून बनवलेल्या १४ लाख लाडूंचे वाटप करण्याची योजना आहे.


१४ लाख लाडूंचे ३.५ लाख पॅकेटमध्ये वाटप केले जाईल
भूमीपूजनाच्या दिवशी अयोध्येत प्रत्येक घरात चार लाडू असलेले पॅकेट वितरित केले जाईल. याची जबाबदारी असलेल्याच्या म्हणण्यानुसार एकूण १४ लाख लाडू बनविण्यात येत आहेत. जे साडेतीन लाख पॅकेटमध्ये भरले जात आहे. एका पॅकेटमध्ये चार लाडू आहेत. जिल्हा भाजपचे कार्यकर्ते हे लाडू संपूर्ण अयोध्येत वितरित करतील.



भूमिपूजन सोहळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व घरासमोर रांगोळ्या व श्रीरामाचा ध्वज लावण्यात येईल.
अयोध्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांसह सर्व घरांवर ध्वज लावण्यात आले आहे. यावर श्री राम आणि हनुमानाची चित्रे आहेत. अयोध्या शहरातून रामजन्मभूमीकडे जाणार्‍या सर्व रस्त्यांवर ५० हजाराहून अधिक झेंडे बसविण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळपासून ४० महिलांचा गट घराबाहेर रांगोळी काढणार आहे. यासह दीप प्रज्वलित करण्याची जबाबदारी अवध विद्यापीठाच्या ललित कलाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@