राम सगळ्यांमध्ये आहे, राम सर्वांसोबत आहे : प्रियांका गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |
Priyanka Gandhi Vadra _1&

 

 
नवी दिल्ली : ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनानिमित्त काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्यांचा संदेश देशवासीयांना दिला आहे. राम मंदिर भूमिपूजनानिमित्त होणाऱ्या शिलान्यास कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे त्यांनी संदेश दिला आहे. सरलता, साहस, संयम, त्याग, वचनवद्धता, दीनबंधु हे रामाचे सार आहे. राम सर्वांमध्ये आहे, 



 
राम साऱ्यांसोबत आहे, भगवान राम आणि माता सीतेचा संदेश त्यांची कृपा सोबत घेऊन राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक समागमाचा हा दिन ठरो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. एका परिपत्रकाद्वारे त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनीही राम जन्मभूमी येथे होणाऱ्या भूमीपूजन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाची सर्व तयारी झाली असून संपूर्ण देशात यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.



@@AUTHORINFO_V1@@