कारवाई करा अन्यथा आम्ही ठोकून काढू ; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |

raj thackeray_1 &nbs


मुंबई :
कोकणात जाण्याची तयारी करणाऱ्या चाकरमान्यांना ई-पासचा अडथळा येत आहे. वारंवार अर्ज करूनही ई-पास नामंजूर होत असल्याने कोकणवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पास नामंजूर होणाऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणारे सर्वाधिक असून दुसरीकडे खासगी एजंट ई-पाससाठी कोणतेही शुल्क नसताना मोठ्या प्रमाणात पैसे आकारून चाकरमान्यांची लूट करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.





मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी बोगस ई पास मिळवून देणाऱ्या दलालाशी संभाषणाची ऑडिओ क्लिपच ट्विटरवर शेअर केली आहे. त्यामुळे ई-पासच्या नावाखाली कोकणवासियांची काही दलालांमार्फत फसवणूक होत असल्याचे उघड झालेले आहे. यात मनसेचा एक कार्यकर्ता ई पाससाठी दलालाशी बोलताना दिसत आहे. रत्नागिरीच्या ई पाससाठी दलाल दोन हजार रुपये मागत असल्याचे क्लिपमधून ऐकायला येत आहे. शिवाय, हा पास नाशिकमधून काढला जाईल, असेही तो सांगतोय. ही ऑडिओ क्लिप टाकून संदीप देशपांडे यांनी सरकारच्या भोंगळ कारभारावर हल्लाबोल केला आहे. परप्रांतीय मजुरांना फुकट सोडणारे राज्यातील ठाकरे सरकार राज्यातील जनतेला दलालांच्या मार्फत लुटत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.



तसेच ई-पासचा काळाबाजर संपूर्ण राज्यभरात चालत असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. ई-पासचा काळाबाजार करुन चाकरमान्यांची फसवणूक करणार्‍या दलालांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठोकून काढेल. असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेला आहे. त्यामुळे राज्य सरकार ई-पासचा काळाबाजार करणाऱ्यावर कोणती कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे. परराज्यातील लोक गावाला जाऊन पुन्हा आले तरी आम्हाला मात्र आमच्याच राज्यातील गावात जाता येत नाही. सरकार बाकीच्या सुविधा देऊ शकत नाही निदान ई-पासची कटकट तरी रद्द करावी, अशी मागणी चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@