स्वसंदेहांवर स्वनियंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |
health_1  H x W





पण, स्वत:वर विश्वास ठेवल्यास आपल्याला जे मनापासून प्राप्त करायचे आहे, त्यावर लक्ष केंद्रित करता येईल. आपल्या जीवनात जर अनिश्चितता नसेल, तर सामान्यपणे जगायलाच मजा येणार नाही. ज्यांना अपयशाची भीती वाटते, त्यांना खरंतर जगायचीच भीती वाटत असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तेव्हा स्वत:च्या वेड्या मनाला वादळात भरकटवणार्‍या विचारांपासून बाहेर काढायला हवे आणि वेळोवेळी एका जागी शांत बसवून निर्णय घ्यायला शिकवायला पाहिजे.



आपले स्वसंदेह आपल्या सर्वांगीण विकासासाठी घातक असतात. स्वसंदेहांनी खरंतर मोठ्या मोठ्या महत्त्वाकांक्षी स्वप्नांचा खात्मा केला आहे. आपल्या स्वप्नांवर जेव्हा आपणच शंका घेतो, तेव्हा खर्‍या अर्थाने आपले शत्रू आपणच असतो. आपल्या मार्गात येणारी उत्तम संधी जेव्हा आपण आपल्याच भ्रांतीने घालवतो, तेव्हा ती कृती ही स्वत:ला समजून विजयाकडे नेणारी असते. विल्यम शेक्सपिअरने म्हटलं आहे- 'Our doubts are traitors and make us lose the good we oft might win, by fearing to attempt.' स्वसंदेहाच्या गर्तेत जाऊन आपण कुठल्याही कृतीचा शुभारंभ करतच नाही.


आपण असे स्वत:बद्दलच संदेह करून घेतो, याचे विश्लेषण आपल्याला आयुष्यात यातून कसं बाहेर यायचे, याची दिशा दाखवेल. आपल्याला आपल्यापेक्षा दुसर्‍याचे जीवन हे अधिक यशस्वी आणि सुखदायी वाटते. यामुळे होतं काय की, आपण दुसर्‍यांना आपल्या आयुष्यावर कब्जा करु देतो. आपल्या आयुष्याची उंची कशी मोजायची, हे दुसर्‍याने ठरविले, तर आपली स्वप्न आपण कशी साकारणार बरे? आपण बर्‍याच वेळा अनेक स्वप्न पाहतो. बरेच जणांना स्वप्न पाहायची आवड असते. पण, स्वप्नांत पाहिलेल्या आपल्या जीवनाला आपण घाबरतो. आपल्याला ते सोसणार नाही असे वाटते. कदाचित आपल्याला आनंदी राहायची भीती वाटत असते आणि आपण ती स्वप्न का पूर्ण होणार नाहीत, याची अनेक गळचेपी कारणे देत बसतो. आपली स्वप्नं अशी आपल्याच ओंजळीत फुंकर मारुन उधळविण्यासारखी दुसरी कठलीही जोखीम आपल्या आयुष्यात असू शकत नाही.


आपण स्वत:चे टीकाकार असायला हवे हे खरे; ज्यामुळे आपल्याला आपल्या विचारांची आणि कृतीची गुणवत्ता सुधारता येते. पण, आपण स्वत:वर इतकी कठोर टीका करु नये की, ज्यामुळे आपल्याला आपली महत्त्वाकांक्षा गुंडाळून ठेवावी लागेल. सगळ्याच बाबतीत आपण स्वत:लाच वाकबगार टीकाकार समजत आपलीच स्वप्ने नष्ट करत बसण्यापेक्षा आपल्या मनाला एक धडपड करणारा विद्यार्थी म्हणून स्वीकारण्यास काय अडचण आहे? थोडं अपयश मिळेल, पण प्रयत्नांती परमेश्वर. आयुष्य हे अनेक विचलित करणार्‍या तारकांनी भरलेलं आहे. पण, स्वत:वर विश्वास ठेवल्यास आपल्याला जे मनापासून प्राप्त करायचे आहे, त्यावर लक्ष केंद्रित करता येईल. आपल्या जीवनात जर अनिश्चितता नसेल, तर सामान्यपणे जगायलाच मजा येणार नाही. ज्यांना अपयशाची भीती वाटते, त्यांना खरंतर जगायचीच भीती वाटत असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तेव्हा स्वत:च्या वेड्या मनाला वादळात भरकटवणार्‍या विचारांपासून बाहेर काढायला हवे आणि वेळोवेळी एका जागी शांत बसवून निर्णय घ्यायला शिकवायला पाहिजे. आपण कधी कधी आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगतो, “आता खूप विचार करत बसू नकोस. पटकन मनाला भिडणारा निर्णय घे.” ‘हृदयावर हात ठेवून बघ आणि निश्चय कर’ कधी कधी आपण अंतर्ज्ञानाला स्मरून काही निवड करतो आणि त्यात काही चुकत नाही. मेंदूच्या बुद्धिप्रामाण्याला तशी मर्यादा नसते. कापूस पिंजून काढतो तसे आपले विचार आपल्याच अवती-भवती उडत असतात. हे बहुतेक सगळे धन्य विचार, बरोबर काय आणि चूक काय, या शंका-कुशंकांत हरवलेले असतात. आपल्या जीवनात आपण असे भरकटत का जातो, याचे एक साधे स्पष्टीकरण, द्यायचे म्हणजे आपल्या मेंदूचा भावनिक कार्यभाग कधीकधी बौद्धिक कार्यभागाला जितके सहकार्य करायला पाहिजे तितके करत नाही. म्हणूनच आपण पाहतो की, बौद्धिक आवरण जबरदस्त असूनसुद्धा अनेक व्यक्ती त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा नापास होतात. बौद्धिकदृष्ट्या अव्वल असलेली ही मंडळी भावनिकदृष्ट्या ‘झिरो’ असतात म्हणून केवळ बौद्धिक क्षमतेवर पूर्णपणे अवलंबून न राहता, आतल्या आवाजाला ऐकण्याची किमया त्यांना जमते. त्यांना ‘जीवन सुंदर आहे’ म्हणजे काय, याची मनस्वी प्रचीती येते.


व्हिनसेंट वॅन गॉग या जगप्रसिद्ध चित्रकाराने छान सांगितले आहे की, तुम्ही तुम्हाला पेटिंग करता येणं शक्य नाही, असा आवाज मनातून ऐकलात, तर तुम्ही पेटिंग जरूर कराच. मनातला आवाज आपसूक शांत असेल. या वाक्यातला सूर अतिशय महत्त्वाचा आहे. स्वसंदेहाच्या जाळ्यात न फसता, तुमच्या मनातल्या आवेगांना वाट द्या. सरळ मैदानात उडी घ्या. स्वसंदेहांना काबूत आणण्यासाठी कणखर आत्मविश्वास हवा. दीर्घकाळ पुरुन उरेल अशी आत्मविश्वासाची शिदोरी जीवनप्रवासात सोबतीला हवी असेल, तर तशी मानसिकता विकसित करायला हवी. त्यासाठी आपल्या मनात आपल्याविरुद्ध द्रोह करणार्‍या निंदकाला तोंडाला कुलूप लावायला शिकवायला लागेल. अशाची चव चाखताना स्वसंदेहांना चाप लावायलाच लागतो.



दिल में उजाला हो,
खुद को संभाला हो
तो यारो क्या बात हैं
यही जीना हैं, यही जीना हैं
जिंदगी खुबसूरत हैं
- आनंद राज आनंद



- शुभांगी पारकर
@@AUTHORINFO_V1@@