आत्मनिर्भर योजनेचा ९९ हजार फेरीवाल्यांना लाभ ! इथे करा अर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |
MODI_1  H x W:

मुंबई : कोरोनामुळे फटका बसलेल्या ९९ हजार फेरीवाल्यांना पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचा लाभ होणार असून त्यांना 7 टक्के व्याजाने १ वर्षासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे. कोरोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचा फटका मुंबईतील फेरीवाल्यांनाही बसला असून त्यांना पुन्हा व्यवसाय करण्यासाठी पंतप्रधान आत्मनिर्भर योजने अंतर्गत ७ टक्के व्याजावर एक वर्षासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे. फेरीवाल्यांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून कागदोपत्री सगळी पूर्तता करणाऱ्या फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध होणार आहे.
 
 
 
फेरीवाला ही प्रत्येकाची गरज झाली असून स्वस्त दरात वस्तू उपलब्ध करुन देतात. परंतु कोरोना विषाणूमुळे संकट ओढवल्यापासून प्रत्येकाच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करण्यात येणार आहे. पंतप्रधान आत्मनिर्भर योजने अंतर्गत ७ टक्के व्याजावर १० हजार कर्ज उपलब्ध होणार आहे. जुलै २०१४ मध्ये पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ९९ हजार फेरीवाले पात्र ठरले आहेत.
 
 
 
ते या योजनेसाठी अर्ज करु शकतात. कागदोपत्री सगळे पुरावे योग्य असल्यास संबंधित बँक त्या फेरीवाल्यास कर्ज उपलब्ध करुन देईल. कोणाला कर्ज देणे न देणे हा त्या बँकेचा अधिकार असणार आहे. कर्जासाठी पालिकेकडे येणारे अर्ज पंतप्रधान कार्यालयात पालिका पाठवणार असून हे कर्ज एक वर्षासाठी परतफेडीच्या अटीवर दिले जाणार आहे. pmsvanidhi.mohua.gov.in या पोर्टलवर फेरीवाल्यांना कर्जासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (असल्यास), आधार कार्ड बरोबर लिंक केलेला मोबाईल नंबर व एक पासपोर्ट फोटो या कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@