माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |

Pranab Mukherjee_1 &

नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव झुंज अखेर अपयशी ठरली. लष्कराच्या रिसर्च अॅण्ड रेफरल रुग्णालयात त्यांनी ३१ ऑगस्टला अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. १० ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र अखेर त्यांनी आज जगाचा निरोप घेतला. त्यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी याबद्दल ट्विटरवरून माहिती दिली. 
 
 
 
 
 
प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट रोजी श्वसन संक्रमणामुळे दिल्लीतील लष्कराच्या रेफरल व संशोधन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचीही लागण झाल्याचेही समोर आले होते. यासह त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक सातत्याने लक्ष ठेवून होते.
 
 
प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. त्यांनी २०१२ त २०१७ दरम्यान राष्ट्रपती पद भूषविले होते. राष्ट्रपतीपद भूषवण्याआधी २००९ ते २०१२ या काळात मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा होती. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात १९६९मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ‘प्रणवदा’ यांची राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना 'भारत रत्न' पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. जवळपास ५ दशक भारतीय राजकारणात सक्रिय होते.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@