काँग्रेसमुळे सत्‍तेत आहात विसरू नका : विक्रांत चव्‍हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Aug-2020
Total Views |

Thane_1  H x W:



पोस्‍टरवरून आघाडीत बिघाडीच्‍या ठिणग्‍या!

ठाणे : सत्‍ताकारणाच्‍या नाट्यात हतबल झालेल्‍या शिवसेना, राष्‍ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसच्‍या पाठिंब्‍यामुळे महाराष्‍ट्रात सत्‍तेच्‍या बोहल्‍यावर चढता आले. मात्र कॅबिनेटने घेतलेल्‍या ए‍कत्रित निर्णयाचे श्रेय पोस्‍टरबाजीतुन दोनच पक्ष घेतात हे दुर्देवी असुन काँग्रेसमुळेच सत्‍तेत आहात हे विसरू नका असा घरचा आहेर आझाडी सरकारला ठाणे शहर‍जिल्‍हा काँग्रेस अध्‍यक्ष विक्रांत चव्‍हाण यांनी दिला. ठाण्‍यातील पोस्‍टर युध्‍दातून आघाडीतील बिघाडीच्‍या ठिणग्‍या पडू लागल्‍या असल्‍याचे दिसुन येत आहे.


काही महिन्‍यापुर्वीच ठाणे शहर अध्‍यक्षपदाची सुत्रे हातात घेतलेल्‍या विक्रांत चव्‍हाण यांनी वेळोवेळी शहरातील प्रश्‍नांवरून सत्‍ताधारी शिवसेनेला धारेवर धरले आहे. पावसाळ्यातील खडयांचा प्रश्‍न असो की करोनाच्‍या विषयातील प्रशासकीय दिरंगाई याविरोधात ठाणे काँग्रेसने शिवसेनेला चांगले घेरले. ठाण्‍यात शिवसेना आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस हे राज्‍यात फक्‍त आपल्‍याचा दोघा पक्षांचे सरकार असल्‍यासारखे करत प्रत्‍येक निर्णयाचे श्रेय आपल्‍याला मिळेल यासाठी वेळोवेळी पोस्‍टरबाजी करत असते. विक्रांत चव्‍हाण यांनी या पोस्‍टरबाजीवर आक्षेप घेत त्‍यावर समांतर पोस्‍टरबाजीने त्‍याला उत्‍तर दिले. कॉग्रसेने पाठींबा दिला नसता तर ठाकरे सरकार सत्‍तेवर आले असेत का ? सरकार तिघांच मग नाव का फक्‍त दोघांच ? अशी पोस्‍टर लावुन शिवसेना व राष्‍ट्रवादी कॉगेसला प्रश्‍न विचारले आहेत. ठाण्‍यातील या पोस्‍टरबाजीतील ठिणग्‍यामुळे आघाडीतील बिघाडी समोर येत आहे.


ठाणे शहरात मुख्‍यमंत्री येतात, अनेक प्रकल्‍पांचे ऑनलाईन उदघाटन होतात मात्र हे होत असतांना त्‍यात काँग्रेसला सन्‍मानाची वागणूक मिळत नाही. तिघांचे सरकार असतांना असे का होते असा प्रश्‍न काँग्रेस कार्यकर्त्‍यांना पडतो. काही नेत्‍यांचे नशिब रातोरात फळफळले मात्र त्‍यासाठी काँग्रेसने आपला पाठीब्‍यांचा हातभार लावला हे मात्र हे नेते विसरले असा टोला ठाणे शहर काँग्रेस अध्‍यक्ष विक्रांत चव्‍हाण यांनी लागावला आहे. काँग्रेस अध्‍यक्षांची ही नाराजी दुर केली जाते की पुन्‍हा नेहमीप्रमाणे काँग्रेसला गृहीत धरून कारभार हाकला जातो हे पाहणे आता आत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.







@@AUTHORINFO_V1@@