पुण्यात कोरोना नियंत्रणात अपयश; दिल्लीलाही टाकणार मागे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2020
Total Views |
Pune _1  H x W:

पुणे : कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा राज्य सरकार करत असले तरीही पुण्यात झिरो ग्राऊंडवरील परिस्थिती मात्र, भीषण असल्याचे समजत आहे. देशातील कोरोना प्रादुर्भाव असलेल्या शहरांमध्ये पुण्याच्या पहिला क्रमांक आहे. रविवारी ३० ऑगस्ट रोजी कोरोना आकडेवारी जाहीर झाल्यानंतर शनिवारी ४ हजार कोरोना रुग्ण आढळल्याचे समजत आहे.
 
 
सरकारी आकडेवारीनुसार, पुणे शहरात बाधित रुग्णांचा आकडा १ लाख ६९,४४८ इतका झाला आहे. ४ हजार २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे १ हजार १६ ०६२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आजपर्यंत ४९ हजार ३६५ इतके रुग्ण उपचार घेत आहेत.
 
 
कोरोना विषाणूच्या सुरुवातीपासून अग्रगण्य शहर असलेल्या मुंबईलाही पुण्याने मागे टाकले आहे. आत्तापर्यंत भारतात कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील आकडेवारी ही देशाच्या २१ टक्के आहे. भारतात कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूमध्ये ४० टक्के दगावलेले रुग्णही महाराष्ट्रातीलच आहेत. विशेषतः मुंबईत महामारीमुळे मृतांचा आकडा सर्वाधिक वाढला.
 
 
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त पसरला होता. पुण्यातील एक किंवा दोन दिवसांमध्ये दिल्लीलाही मागे टाकेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दिल्लीत एकूण रुग्णसंख्या १ लाख ७१ हजार ३६६ रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही १ लाख ६९ हजार ४४८ इतकी झाली आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या या रोगाच्या विळख्यात जगभरातील एकूण २.५ कोटी रुग्ण अडकले. जगभरात एकूण ८.४ लाख लोकांचा मृत्यू झाला.
 
 
पुणे विभागाची आकडेवारी पाहता पुण्यासह साताऱ्यात १२ हजार ९२५ आढळले आहेत. त्यापैकी ७७०७ रुग्ण बरे झाले तर ३२८ जणांचा मृत्यू झाला व अन्य दोघांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला. आत्तापर्यंत ४ हजार ८८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत एकूण बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ८३५ इतकी आहे. ६ हजार ८६९ रुग्ण बरे झाले. ४०३ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून ४ हजार ५६३ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@