अग्गो बाई, सासूबाई...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2020   
Total Views |

sonia gandhi _1 &nbs



महाराष्ट्राच्या दात आणि नखं काढलेल्या वाघाच्या शब्दकोषात कोथळा, वाघनख, औरंग्या, अफजुल्या, निजाम हेच शब्दच निर्वाणीचे आहेत. (नाही म्हणायला कोमट पाणी शब्द नव्याने भरती झाला आहे)तर अगदी तसेच या नामशेष झालेल्या महाराणींच्या शब्दकोषात लोकटंट्र, सांविधान, हतया, मोडी, बाजपा, मौट का सोदागर निसेध हेच आणि इतकेच शब्द महत्त्वाचे आहेत. मॅडमनी माईक हातात घेतला की, हे शब्द बाहेर पडणारच पडणार. आता या हरवलेल्या तख्ताच्या महाराणींना कुणी सांगावे की, मॅडम यापलीकडे ही भारतीय भाषेत शब्द आहेत.



वेळ होती छत्तीसगढमध्ये विधिमंडळाचे नवे सभागृह उभारण्याचा पायाभरणी समारंभ, काळ होता कोरोनाच्या संकटकाळाचा आणि या संकटात देशाचे सार्वभौमत्व, सौहार्द टिकेल यासाठी प्रयत्न करण्याचा. पण सोनिया गांधी मॅडमनी याही वेळी आपले प्रसिद्ध वाक्य उच्चारलेच ‘लोकटंट्र खटटरे मे हैं।’ सार्वजनिक कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले, भाषण केले, विचार मांडले, मार्गदर्शन केले, माहिती दिली, या सगळ्या व्यक्त होण्याच्या विविध क्रियेत मॅडमची अभिव्यक्ती ठरलेली. ‘लोकटंट्र की हतया हुई’ असे बोबडे बोल ऐकले की समाजावे मॅडमना जाग आली आहे. असो, जसे महाराष्ट्राच्या दात आणि नखं काढलेल्या वाघाच्या शब्दकोषात कोथळा, वाघनख, औरंग्या, अफजुल्या, निजाम हेच शब्दच निर्वाणीचे आहेत. (नाही म्हणायला कोमट पाणी शब्द नव्याने भरती झाला आहे)तर अगदी तसेच या नामशेष झालेल्या महाराणींच्या शब्दकोषात लोकटंट्र, सांविधान, हतया, मोडी, बाजपा, मौट का सोदागर निसेध हेच आणि इतकेच शब्द महत्त्वाचे आहेत. मॅडमनी माईक हातात घेतला की, हे शब्द बाहेर पडणारच पडणार. आता या हरवलेल्या तख्ताच्या महाराणींना कुणी सांगावे की, मॅडम यापलीकडे ही भारतीय भाषेत शब्द आहेत. संविधान हे भारताच्या राजकारणामध्ये संवेदनशीलता आणि भारतीयांचे कायदेशीर भारतीयत्व राखणारे मौलिक तत्त्व आहे. पण या संविधानाच्या शक्तीवर शंका घेऊन ‘सांविधान खतरे मे हैं’ असे बोंबलणारेच संविधानाचा अपमान करत आहेत. आताही मॅडम सोनिया जेव्हा म्हणतात लोकशाही संस्था नष्ट होऊ लागल्या आहेत, हुकूमशाहीचा प्रभाव वाढत आहे. ‘लोकटंट्र खटटरे मे हैं’ म्हणणार्‍या सोनिया मॅडमनी संविधानाचा अभ्यास केला तर बरे होईल. संविधानामध्ये अशा तरतुदी आहेत की, न्याय संस्था, संसद आणि इतरही प्रशासकीय संस्था एकमेकांशी समन्वय साधतील आणि कुणीही कुणाला डावलू शकणार नाहीत. भारतीय संविधानाची लोकशाही पद्धती इतकी मजबूत आहे की भल्या भल्यांचे तख्त मोडून पडले. संदर्भासाठी मॅडम सोनियांनी २५ जून १९७५ ते १९७७दरम्यान त्यांच्या सासूबाईंनी भारतावर लादलेली आणिबाणी, हुकूमशाही पाहावी. तेव्हा रचलेले लोकशाहीला मारण्याचे कट कारस्थान अभ्यासावे. मग ‘लोकटंट्र की हतया’ बोलण्याआधी मॅडमच्या तोंडून निघेल.. अग्गो बाई... सासूबाई...!



ऑनलाईन भावी पंतप्रधान


साहेबांनी देशभरातल्या आघाडीचे नेतृत्व करावे. खरेतर मला म्हणायचे होते की, साहेबांनी जगभराचेच नेतृत्व करावे. नव्हे नव्हे तारांगणाचे, अवकाशाचे नेतृत्व करावे. हे नेतृत्व करावे ही कुणाची इच्छा बरे? कुणाचे नाव घ्यावे बरे? हा माझेच नाव घेतो. माझी इच्छा आहे की, साहेबांनी असे नेतृत्व करावे. आता महाराष्ट्राच्या यशस्वी (यशस्वी की अयशस्वी, बहुतेक अयशस्वीच, पण बोलू शकत नाही, साहेब रागावतील) आपण यशस्वीच म्हणायचं. तर महाराष्ट्रात भरपूर यश मिळाल्यानंतर आम्ही देशातही हा प्रयोग राबवणार आहोत. सोनिया मॅडम, शरद साहेब, माया मॅडम, ममता मॅडम, झालेच तर नितेशकुमार साहेब सगळे भावी पंतप्रधान आहेत. त्यांचे नेतृत्व आमचे साहेब करतील. हे सगळे दोन दोन दशक भावी पंतप्रधान आहेत. मग आमचे साहेब का नकोत? भावी पंतप्रधान. आमच्या साहेबांची वाट म्हणजे वाटचाल हो, तर ही वाटचाल आम्हीच लावली म्हणजे ठरवली. शरद साहेब त्यावेळी माझ्यावर बेहद खूश होते. पण शरदाच्या चांदण्याचं दान आमच्या घरात कुटुंबात पडलेच नाही. आमची झोळी रिकामीच राहिली. लय मागणं नव्हतं. पण छे, आम्हाला काही मिळाले नाही. जाऊ दे. आता साहेब भावी पंतप्रधान बनतील. मी कोण बनेन? साहेब मागे म्हटले होते की, त्यांना निष्ठावान सैनिकाला संधी द्यायची आहे. ‘उम्मीद पर दुनिया कायम हैं,’ तर साहेब तिकडे गेले की इकडे ‘मैं हूं ना।’ काय म्हणता आमचे साहेब मुंबईतही दौरे करत नाहीत तर देशात कसे दौरे करतील? तर त्यात काय आहे, साहेब ऑनलाईन सगळं करतील, ऑनलाईन सभा घेतील, ऑनलाईन आदेश देतील, ऑनलाईन देशाचं नेतृत्व करतील. काय म्हणता या ऑनलाईनच्या ‘ऑन ऑप’चा रिमोट कुणाकडे असेल? तर हे काय विचारणे झाले? भावी पंतप्रधान संघटनेचे आजीवन मार्गदर्शक महामहिम बारामतीचे काका साहेबांशिवाय हा रिमोट कुणाच्या तरी हातात शोभेल काय? दिल्लीच्या मॅडमही रिमोट चालवतील. कधी काका कधी मॅडम आणि इतर सर्ववेळ इतर भावी पंतप्रधान आणि उरल सुरल्या वेळेत परिस्थिती ‘अनकंट्रोल’ करायला ‘मैं हूं ना...’
@@AUTHORINFO_V1@@