रायगडासह कोकणच्या मंदिरांची मृदा, नद्यांचे जल अयोध्येला रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2020
Total Views |
Pramod Sawant_1 &nbs
 
 
 

रुद्रेश्वर मंदिर गोवा साखळी येथे कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत



मुंबई : ५ ऑगस्ट रोजी अयोध्येला श्री राम जन्मभूमि वर होणाऱ्या भूमिपूजन समारोहासाठी देश भराच्या पवित्र मठ / मंदिरांची माती आणि पवित्र नद्यांचे जल अयोध्येला पाठविण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद कोंकण प्रांत द्वारा वि.हिं.प. चे जन्मस्थान असलेले सांदिपनी आश्रम – पवई, श्री भगवान खंडेराय यांच्या बाणाने उत्पन बाण गंगा देवस्थान मुंबई, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महारज यांच्या स्वराजाची राजधानी दुर्गराज किल्ले रायगड आदी ठिकाणची माती व जल अयोध्येकडे रवाना करण्यात आले आहे.
 
 
तसेच गोवा राज्य प्रसिद्ध और पवित्र मंदिर शांता दुर्गा (कवळे), मंगेशी (फोंडा), मल्लिकार्जुन (काणकोण), म्हाळसा देवस्थान (मार्दोळ), महालक्ष्मी देवस्थान (पणजी), लईराई देवस्थान शिरगाव और महारुद्र मंदिर हरवले (साखळी) इत्यादी मंदिर / मठांच्या विश्वस्थ आणि पुजार्‍यांनी आपआपल्या मंदिर परिसरातील माती व पवित्र नद्यांचे पाणी अयोध्येत होत असलेल्या श्री राम जन्मभूमि वर होणार्‍या भूमिपूजन समारोहासाठी विश्व हिंदू परिषदेकडे सुपूर्द केले आहे.
 
 
गोवा येथील साखळी येथे आयोजित कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. अयोध्येत प्रभू श्री रामाच्या जन्म स्थानावर भव्य मंदिराच्या निर्माण कार्याचा शुभारंभ बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२०, श्रावण कृष्ण द्वितीया शके १९४२ रोजी संपन्न होत आहे. हिंदू समाजाची शेकडो वर्षांच्या अनवरत तपश्चर्येनंतर सर्व रामभक्तांच्या आकांक्षा पूर्ण होण्ताच्या या पवन समयी विश्व हिन्दू परिषद् कोंकण प्रांत सर्व राम भक्तांनाही आवाहन करण्यात आले आहे.
 
 
सर्व रामभक्तांनी आपल्या घरी सामूहिक बैठक करून सकाळी १०.३० ते ११.३० वाजे पर्येंत आपल्या आराध्य देवाचे भजन-पूजन, कीर्तन स्मरण करावे, पुष्प समर्पित करावे, आरती करावी व प्रसाद वाटावा. भूमीपूजनाचा कार्यक्रम लाईव्ह पाहावा. आपल्या घरी, सोसायटी, गाव तसेच बाजारात यथा शक्ती सजावट करावी प्रसाद वाटावा. सायंकाळी सूर्यास्तानंतर दीपोत्सव साजरा करावा.
 
 

आपल्या समर्थानुसार अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माण कार्यासाठी यथाशक्ति दानाचा संकल्प करावा. उपरोक्त सर्व योजना व कार्यक्रम हे कोरोना पासूनच्या राक्षे संदर्भातील सर्व साधन वापरावे तसेच सरकार व प्रशासनाद्वारे दिल्या गेलेल्या दिशा-निर्देशांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.




 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@