सुशांत सिंह प्रकरण : मुंबईत चांगल्या लोकांचे जगणे धोकादायक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2020
Total Views |

amruta fadanvis_1 &n
 

 
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरण ज्या प्रकारे हाताळले जात आहे, त्यानुसार मुंबईने आपली माणूसकी गमावली की काय अशी भीती आता वाटू लागली आहे. सुशांत सिंह प्रकरणामुळे मुंबईत सभ्य आणि निष्पाप लोकांचे जगणेच असह्य झाल्याचे दिसत आहे, अशी प्रतिक्रीया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. सुशांत सिंह प्रकरणावरून त्यांनी आता संताप व्यक्त केला आहे.



 


सुशांत सिंह प्रकरणाला आता दररोज नवनवीन वळण येत आहे. मुंबई महापालिकेने पाटणा एसपी विनय तिवारी होम क्वारंटाईन केले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलीसांना बळजबरीने क्वारंटाईन केले आहे, असा आरोप बिहार पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे मुंबई पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत होते. आता मात्र, मुंबई महापालिकेलाही लक्ष्य करण्यात आले आहे. या प्रकारामुळे मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.
 


बिहारहून आलेले पोलीस अधिकारी मुंबईतील गोरेगांव (पूर्व) मधील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) ग्रुप आठ विश्रामगृहात मुक्कामी आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयाला मिळाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने, त्यांना कोरोना संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाइन) करणे आवश्यक होते. त्यामुळे महापालिकेचे पथक रविवारी सायंकाळी विश्रामगृहावर पोहोचले” असे पालिकेच्यावतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.






@@AUTHORINFO_V1@@