मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून यावरून विरोधीपक्ष भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.महाराष्ट्राच्या ग्रामीण क्षेत्रात पसरणारा कोरोना ही मोठी चिंतेची बाब झाली आहे. यावर राज्यसरकारने तात्काळ कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणीही भाजपने केली आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, 'महाराष्ट्राच्या ग्रामीण क्षेत्रात पसरणारा कोरोना ही मोठी चिंतेची बाब झाली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रसार वेळीच थोपवण्यासाठी लॉकडाऊनपासून औषधोपचारांपर्यंत कोणत्याच धोरणात नियोजन,सातत्य व कठोर अंमलबजावणी नसल्याने महाराष्ट्र ही देशाची कोरोना राजधानी झाली आहे.' असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव चिंताजनक असून महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव ग्रामीण आणि निम-शहरी भागात वेगाने वाढत आहे. त्यातच याभागात आरोग्य सेवा मर्यादित आहेत. राज्याच्या एकूण कोरोना व्हायरस मृत्यूंपैकी जवळजवळ एक चतुर्थांश मृत्यू उघडकीस आला आहे आणि २८% प्रकरणे आता छोटी खेडे आणि शहरी भागातील आहेत. शुक्रवारी मिळालेल्या ७.३ लाख प्रकरणांपैकी २ लाखाहून अधिक रुग्ण छोटी खेडी व तालुका ठिकाणातील आहेत. उर्वरित सुमारे ५.३ लाख प्रकरण २७ निमशहरी भागातील आहे. अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षनुसार एकूण 23,४४४ मृत्यूंपैकी ५,५०० (२३%) मृत्यू ग्रामीण भागात झाले आहेत.