सुरक्षादलांच्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2020
Total Views |
JK_1  H x W: 0
 


जम्मू : जम्मू काश्मीरच्या शोपिया येथील किलूरा भागात सुरक्षा दलांच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तसेच एका दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात यश आले आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडे एक एके-47 आणि तीन पिस्तुल ताब्यात घेतले आहे. दोन आठवड्यात या भागातील १० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
 
 
 
 
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघांची ओळख पटवण्यात आली आहे. एक दहशतवादी शकूर पर्रे अल बद्र संघटनेशी जोडलेला आहे. दुसरा दहशतवादी सुहैल भट्ट हा आहे, त्याने काही दिवसांपूर्वी खानामोह येथील सरपंचांची अपहरण करुन हत्या केली होती.
 
 
 
१७ आणि १८ ऑगस्ट रोजी बारमूलाच्या करीरी भागात चकमक झाली होती. यात सुरक्षादलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यात लष्कर ए तोयबाचे दोन कमांडर सज्जाद आणि हैदर उस्मान यांचा सामावेश आहे. हैदर बांदीपोरा या ठिकाणी झालेल्या हत्याप्रकरणांचा प्रमुख सुत्रधार होता. तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामावून घेण्यासाठी तो प्रशिक्षण देत होता.
 
 
 
काश्मीर आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी उस्मानने भाजप नेता वसीम बारी यांची त्यांचे वडिल आणि भावासह हत्या केली होती. दक्षिण काश्मीरच्या शोपिया येथे १९ ऑगस्टमध्ये झालेल्या दोन चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. हंदवाडा गनीपोरा येथे दोन दहशतवादी ठार करण्यात आले.


@@AUTHORINFO_V1@@