'स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले ' ; ठाकरे सरकारला भाजपचा टोला

    28-Aug-2020
Total Views |

ashish shelar_1 &nbs




मुंबई :
अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातून याचिका दाखल झाल्या होत्या. त्यात पर्यटन मंत्री आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरेंच्या याचिकेचादेखील समावेश होता. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.






ते ट्विट करत म्हणाले, एका 'बबड्याच्या' हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला.त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार ! ऐकतो कोण? मा.सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला ! असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करत ठाकरे सरकारला टोला लगावला. ते पुढे म्हणतात, कुलपती म्हणून मा.राज्यपालांना,कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही.शिक्षण तज्ञांची मते घुडकावली.युजीसीला जुमानले नाही.मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले.अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले.काय साध्य केले? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील "पाडून दाखवा सरकारने स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले असे म्हणत त्यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना खचून न जाता परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या.यश तुमच्या वाट्याला नक्की येईल असे म्हणत तुमचे भविष्य उज्वलच आहे असे सांगत परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.



सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयांनंतर आता विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. यासंदर्भात यूजीसीसोबत सल्लामसलत करत परीक्षांच्या तारखा ठरवून घ्याव्या असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.