सुशांतसिंह प्रकरणाबाबत माझा अभ्यास नाही : सुप्रिया सुळे

    27-Aug-2020
Total Views |

supriya sule_1  
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत आयुक्तांसह चर्चा केली.मात्र बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवादात अनेक प्रश्नांची उत्तरे देत सुळेंनी सुशांतसिंह प्रकरणावर बोलणे टाळले आहे.
सुप्रिया सुळे यांचे भाचे पार्थ पवार यांनी सुशांतसिंह प्रकरणात भूमिका घेतल्यामुळे पवार कुटुंबात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता सुळेंनी सुशांतसिंह प्रकरणाचा आपला अभ्यास नसल्याचे सांगत बोलणे टाळले आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अंतिम वर्षांच्या परिक्षेविषयी देखील सुळेंनी मौन कायम ठेवले. 'अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत मी सरकार बरोबर आहे, जी सरकारची भूमिका तीच माझी भूमिका असले, आता विषय न्यायप्रविष्ट आहे. फक्त तारीख आणखी पुढे ढकलायला नको' असा आशावाद सुळेंनी व्यक्त केला आहे.