भय बिन होय ना प्रीत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2020   
Total Views |

jp_1  H x W: 0



काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनीही अणुचाचणी, थर्मोन्युक्लिअर बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्याच्या तयारीची अमेरिकी उपग्रहांनी छायाचित्रे टिपल्यामुळे अमेरिकेच्या दडपणाखाली भारताला तशाप्रकारची परीक्षण चाचणी घेता आली नाही. मात्र, १९९८साली अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी डॉ. कलाम आणि आर. चिदंबरम यांची भेट घेतली. ‘चाचणी घेण्यासाठीची तयारी किती दिवसांत होऊ शकेल?’ असा प्रश्ना वाजपेयी यांनी डॉ. कलाम यांना विचारला. त्यावर डॉ. कलाम म्हणाले, “तुम्ही आज होकार दिला, तर पुढच्या ३०दिवसांत चाचणी घेऊ!” आणि या थोर शास्त्रज्ञाने दिलेला शब्द खरा केला



“अण्वस्त्र हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पापांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर जगातल्या सर्वच देशांनी अण्वस्त्र चाचणी थांबवली पाहिजे. तसेच या विनाशकारी अस्त्राच्या वापरावर कायमची बंदी आणावी.” संयुक्त राष्ट्राच्या डिसआर्ममेंट अफेअरच्या अंडर सेक्रेटरी जनरल इझुमी नाकामिट्सूंनी नुकतेच विधान केले. अर्थात, जगाने कायमच अण्वस्त्र चाचणीला विरोधच केला आहे. अण्वस्त्रांचा वापर मानव जातीच्या समूळ विनाशाला कारणीभूत होईल, यात दुमत नाही. मूळ जपानच्या असलेल्या इझुमी नाकामिट्सूंनी अण्वस्त्र चाचणीसंदर्भात अत्यंत निर्वाणीची सूचना करणे याला महत्त्व आहे. कारण, ६ ऑगस्ट,१९४५ रोजी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला. त्या हल्ल्याचे दुष्परिणाम पाहून जग हादरले होते.अण्वस्त्राच्या विषाची परीक्षा जग का घेत आहे? ‘भय बिन होय ना प्रीत’ हेच तत्त्व जगात सत्य असावे. त्यामुळेच एकमेकांना घाबरवण्यासाठी प्रत्येक देश अण्वस्त्रधारी बनण्याचा प्रयत्न करतो. हे करताना देश सांगतात की, आम्ही शत्रुराष्ट्रांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.



असो, संयुक्त राष्ट्राने या अण्वस्त्रांची दखल न घेतली तर नवलच! २ डिसेंबर, २००९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये दि. २९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक अण्वस्त्र चाचणीविरोधी दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर २०१० साली पहिल्यांदा हा दिवस जगभर साजरा करण्यात आला. पण, खूप आधी या दिवसाचा पाया रचला गेला होता. कझाकिस्तानने दि. २९ ऑगस्ट, १९९१ रोजी अण्वस्त्रपरीक्षण विरोधात प्रस्ताव मांडला होता. तसेच जगभरातील देशांचे समर्थनही मागितले होते. त्यावर इतर अनेक देशांनी समर्थन दर्शविलेही. संयुक्त राष्ट्र संघात समाविष्ट देश, जगभरातल्या नामांकित स्वयंसेवी संस्था, विचारवंत, कलावंत यांनी या प्रस्तावनेला समर्थन दिले. शेवटी दि. २९ ऑगस्ट , २००९ रोजी २९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक अण्वस्त्र चाचणीविरोधी दिन’ म्हणून घोषित केला गेला.


आतापर्यंत जगभरात दोन हजार वेळा अण्वस्त्र परीक्षण झाले असावे, असे ‘मानले जाते.’ ‘मानले जाते’ ते यासाठी की, जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही लपूनछपून ही चाचणी सुरूही असेल.भारताच्या परिप्रेक्ष्यात बोलायचे झाल्यास, काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनीही अणुचाचणी, थर्मोन्युक्लिअर बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्याच्या तयारीची अमेरिकी उपग्रहांनी छायाचित्रे टिपल्यामुळे अमेरिकेच्या दडपणाखाली भारताला तशाप्रकारची परीक्षण चाचणी घेता आली नाही. मात्र, १९९८साली अटल बिहारी वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर दोनच दिवसांत त्यांनी डॉ. कलाम आणि आर. चिदंबरम यांची भेट घेतली. ‘चाचणी घेण्यासाठीची तयारी किती दिवसांत होऊ शकेल?’ असा प्रश्ना वाजपेयी यांनी डॉ. कलाम यांना विचारला. त्यावर डॉ. कलाम म्हणाले, “तुम्ही आज होकार दिला, तर पुढच्या ३०दिवसांत चाचणी घेऊ!” आणि या थोर शास्त्रज्ञाने दिलेला शब्द खरा केला. त्यावेळी ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया वगळता इतर कोणत्याही देशांकडे अण्वस्त्रे नव्हती. त्या काळात भारताने धाडस करून हे पाऊल उचलले. अमेरिकेच्या ’सीआयए’लाही या चाचणीचा सुगावा लागू शकला नाही. चाचणी घेतल्याचे जाहीर केल्यानंतर केवळ इस्रायलनेच भारताला पाठिंबा दिला होता. त्यानंतर संतप्त अमेरिकेने तर भारतावर निर्बंधही लादले होते.


या अणुचाचणीची घोषणा करतानाच पंतप्रधान वाजपेयी यांनी लोकसभेत महत्त्वाची विधाने केली. “कुठल्याही युद्धामध्ये आम्ही प्रथम अण्वस्त्रे वापरणार नाही, ज्या देशाकडे अण्वस्त्र नाही, त्यांच्याविरोधात आम्ही त्यांचा वापर करणार नाही.” भारत देश मानवी मूल्यांचा प्रेरक देश असल्याने अण्वस्त्रांचा वापर न्यायानेच होणार हे नक्की. पण, या पार्श्वभूमीवर इतर देशांचे काय? चीन आणि पाकिस्तानसारखे देश अण्वस्त्र चाचणीला कशा प्रकारे हाताळण्याचा विचार करतील, हे सगळ्या जगाला माहिती आहे. अर्थात, या देशांच्या कोणत्याही दुष्ट आततायी कृत्याला उत्तर द्यायला उर्वरित जग आणि त्यातही आजचा भारत समर्थ आहे. अण्वस्त्र चाचणी परीक्षणाविरोधात आजही संयुक्त राष्ट्र गंभीरतेने विचार करत आहे. त्यामुळेच जागतिक अणुचाचणीविरोधी दिनाच्या काही दिवसांआधीच संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींनी अण्वस्त्र चाचणीविरोधात विधान केले आहे. आशा करूया की, जागतिक अणवस्त्र चाचणीविरोधी दिनाची संकल्पना खर्‍या अर्थाने जग वास्तवात जगेल.
@@AUTHORINFO_V1@@