दिल्लीतला गांधीगोंधळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2020   
Total Views |
Rahul Gandhi Sonia Gandhi




गांधी घराण्याचीही काँग्रेसचे अध्यक्षपद कुटुंबाबाहेर देण्याची मनस्वी इच्छाही नाही आणि पराजयाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचे मनोधैर्य तर नाहीच नाही. आज-उद्या काँग्रेसला साक्षात्कार होईल, नेतेमंडळी आत्मपरीक्षण करतील, असे वाटले होते. पण, ज्या ज्या वेळी अशा आत्मचिंतनाचे प्रयत्न केले जातात आणि अध्यक्षपदासाठी गांधी घराण्यापलीकडचा विचार होतो, तेव्हा तेव्हा दिल्लीत सदैव गोंधळ उडतो. एखादी भिंत खचण्यापूर्वी आधी हळूहळू त्या भिंतीला भेगा पडतात. वेळीच डागडुजी न केल्यास त्या भेगा अशाच वाढत जातात. कालांतराने भिंतीचा काही भाग कोसळतोही. पण, या छोट्याशा पडझडीचा भिंतीवर काहीच मोेठा परिणाम होणार नाही, म्हणून त्याकडे कानाडोळा केला जातो. भिंत अशीच अधूनमधून कोसळत ‘मी संपतेय’ असा सूचक इशाराही देत असते. पण, त्या भिंतीआड सुरक्षित वावरणार्‍यांना ही भिंत दुसर्‍याबाजूने जणू अभेद्यच वाटते. म्हणून छोट्यामोठ्या पडझडीकडे साफ दुर्लक्ष केले जाते. परिणामी, एकच मोठा धक्का बसतो आणि संपूर्ण भिंतच एकाएकी जमीनदोस्त होते. सध्या काँग्रेसची अवस्थाही अशीच अखेरच्या घटका मोजणार्‍या भिंतीसारखी झालेली दिसते. पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष अध्यक्षपदाचा पेच सोडवण्यात सपशेल अपयशी ठरला. गांधी घराण्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही असे मानणारा एक गट आणि बिगरगांधी घराण्यातील व्यक्तीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची हीच ती योग्य वेळ, या धारणेचा दुसरा गट. मग काय, पत्रापत्री झाली, काँग्रेस कार्य समितीची तातडीने बैठक बोलवण्याचे तोंडदेखले सोपस्कारही पाड पडले. सात तास म्हणे मॅरेथॉन चर्चा, आरोप-प्रत्यारोप, रुसवेफुगवे आणि सगळे हायव्होल्टेज राजकीय नाट्य चांगलेच रंगले. पण, अंतत: निर्णय काय? तर सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदावर किमान पुढील सहा महिने कायम राहतील. असला बैठकींचा खेळ खेळून आपल्याला हवा तोच निर्णय घेण्याचा प्रकार काँग्रेसमध्ये पहिल्यांदा झालेला नाही. यापूर्वीही सोनिया गांधी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देतील आणि नवीन अध्यक्षाची निवड होईल वगैरे चर्चा पद्धतीरपणे रंगवल्या गेल्या. पण, ना तसे भूतकाळात झाले आणि भविष्यातही होईल, याची शाश्वती नाहीच. गांधी घराण्याचीही काँग्रेसचे अध्यक्षपद कुटुंबाबाहेर देण्याची मनस्वी इच्छाही नाही आणि पराजयाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचे मनोधैर्य तर नाहीच नाही. आज-उद्या काँग्रेसला साक्षात्कार होईल, नेतेमंडळी आत्मपरीक्षण करतील, असे वाटले होते. पण, ज्या ज्या वेळी अशा आत्मचिंतनाचे प्रयत्न केले जातात आणि अध्यक्षपदासाठी गांधी घराण्यापलीकडचा विचार होतो, तेव्हा तेव्हा दिल्लीत सदैव गोंधळ उडतो आणि महाराष्ट्रातही काँग्रेसची दरी अधिक रुंदावताना दिसते.
 

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये घमासान

 
 
दिल्लीतील गोंधळाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले नसते तरच नवल. सोनिया गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी माफी मागावी, अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात फिरू देणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे नेते आणि आघाडी सरकारमधील मंत्री सुनील केदार यांनी दिला. कारण, ज्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले, त्यात महाराष्ट्रातील मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांचाही समावेश होता. हे तीन नेते आज पत्र लिहून पक्षनेतृत्वाला विरोध करीत आहेत, पण त्यांनी पक्ष वाढीसाठी काय केले, असा सवाल उपस्थित करुन केदार थांबले नाहीत, तर त्यांनी २०१४च्या निवडणुकीतील काँग्रेसच्या राज्यातील पराभवाचे खापरही पृथ्वीराज चव्हाणांवर फोडले. एकूणच काय, तर गांधी घराण्याच्या नेतृत्वाला विरोध करणार्‍यांनी सोनिया गांधींची माफी मागावी, असा सूर उमटला. दुसरीकडे राज्याचे आणखीन एक मंत्री विजय वडेट्टीवर यांनाही आपली गांधी घराण्यावरील निष्ठा दाखण्याचे भरते आले. त्यांनी तर चक्क राहुल गांधींनी सांगितले तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू, असे मोठे विधान केले. खरं पाहायला गेलं तर हा कॉँग्रेसचा अंतर्गत प्रश्न, पण तरीही वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे महत्त्व अधोरेखित करत शिवसेना आणि राष्ट्रवादीला एक सूचक इशारा दिला. हे कमी की काय म्हणून काँग्रेसच्या नाराज ११ आमदारांनी सरकारमध्ये काम होत नसल्याचे कारण देत उपोषणाचा इशारा दिला. पण, त्यांची मनधरणी केली ती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी. मागे काँग्रेसच्याच मंत्री यशोमती ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना तुमची कामं होत नसतील तर धुडगूस घालण्याचा अजब सल्लाही दिला होता. गेल्या काही काळात काँग्रेसची ही कुरकुरणारी खाट म्हणूनच तुटते की काय, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झालेली दिसते. पण, काँग्रेसची ही खाट डळमळीत होणे हे राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या सत्तेतील घटकपक्षांनाही परवडणारे नाहीच. त्यामुळे काँग्रेसचे रुसवेफुगवे दूर करण्यापलीकडे मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीकडे पर्याय तसा नाही. पण, पक्षांतर्गत दुफळी तसेच सरकारमध्येही नाराजी, हे असे किती काळ काँग्रेसला रेटता येईल, त्यावर राज्यातील महाविकास तिघाडीचे भवितव्य विसंबून आहे, अन्यथा जे फडणवीस म्हणतात की, हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, तो दिवस दूर नाही.




@@AUTHORINFO_V1@@