राम मंदिर - धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक विकासाकडे वाटचाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2020
Total Views |
Ayodhya_1  H x
 
 

 
 

सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिनांक ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर निर्माणाचे भूमिपूजन आणि शिलान्यास केला. मुस्लीमांना अयोध्येत मस्जिद बांधण्यासाठी ५ एकर जमीन देण्यात आली आहे. अशा रीतीने रामजन्म भूमी विवादाचा सुखद शेवट झाला. भारताच्या इतिहासात हा निर्णय सुवर्णक्षरात लिहिला जाईल. भविष्यातील प्रजा युगा-युगापर्यंत याची आठवण ठेवतील.
 
 
 
 
आता मंदिर निर्माणानंतर अयोध्या नगरीचा संपूर्ण कायापालट होणार आहे. अयोध्या नगरी सामाजिक धार्मिक आणि आर्थिक दृष्टीने आगेकुच करणार आहे. याचा फायदा केवळ अयोध्येला नसून संपूर्ण उत्तर प्रदेशास मिळणार आहे. आताच्या अयोध्ये नगरीबाबत आपण जाणुन घेऊ. अयोध्या नगर हे एकूण ७८ किलोमीटरच्या विस्तारात पसरले आहे. त्याच्या शेजारी फैजाबाद शहर आहे. आयोध्येची हद्द नगरपालिकेच्या अखत्यारीत येते. २०११ मध्ये अयोध्येची लोकसंख्या ५५, ८९० इतकी होती. जी आता एक लाखाच्या जवळपास असेल येथील जनता प्रामुख्याने शेती तसेच लघु उद्योगावर आपली उपजिविका चालवितात.
 
 

Ayodhya_2  H x  
 
 
 
 
अयोध्या नगर पालिकेची वार्षिक आवक रु. १,६८७.५९ कोटीची आहे. तर खर्च रु. १,६४२.९८ कोटीचा आहे. त्याची अतिरिक्त तुट रु. ४४.६१ कोटीची आहे. ५ वर्षानंतर २०२५ पर्यंत हे बजेट १०० पटीने वाढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सरकारची योजना भव्य राम मंदिरासोबत नगराचा संपूर्ण विकास करण्याचा आहे. राज्य सरकार अयोध्येला नवे रंगरुप देणार आहे. त्यानंतर अयोध्या नगरी धार्मिक स्थळासोबत सुंदर अद्भुत पयर्टन स्थळाचे रुपांतर होणार आहे.
 
 
 
राम मंदिराचे निर्माण कार्य तीन-साडेतीन वर्षात पूर्ण होण्याची कल्पना आहे. २०२४ पर्यंत तेथे दररोज जवळपास ८० हजार ते १ लाख देशातील विदेशातील भक्त तसेच पर्यटक अयोध्येत येथील अशी आशा आहे. येणाऱ्या काळात आर्थिक दृष्ट्या राममंदिर हे
देशातील मोठे मंदिर असेल यात शंका नाही.
 
 

Ayodhya_3  H x  
 
 
 
सरकारची विकास योजना
 
श्रीराम विमानतळ निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने रु. ५०० कोटींची तरतुद केली आहे. एक अशा प्रकारचे रेल्वे स्थानक निर्माण करण्यात येणार आहे. येणाऱ्या सर्व प्रवाशांना सर्व सोयी, सुविधा, तंत्रज्ञानाने विकसित असे असेल तसेच रेल्वे मंत्रालय अयोध्येची विशेष रेल्वे सुरू करण्याच्या तयारीत आहे.
 
 
 
नगराच्या संपूर्ण विस्तारात मल्टी लेवल पार्किंगची व्यवस्था आणि रुंद रस्ते बांधण्यात येणार आहेत. मंदिर प्रवेशासाठी २ कि. मीचा एलीवेटेड रस्ता निर्माण होणार आहे. शरयु नदीच्या दोन्ही काठावर हॉटेल्स, रेस्टॅरंट, फुडकोर्ट, मनोरंजन पार्क बनविण्यात येणार आहे.
 
 
 

Ayodhya_4  H x  
 
 
 
मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत रोमपुरा आणि त्यांचे सुपुत्र आशिष यांची अशी योजना आहे की मंदिर परिसरातील जवळपासच्या जागेत ३६० डिग्री थियेटर, म्युझियम, फोटो गॅलरी, प्रार्थना हॉल निर्माण करणे. तसेच लेझर साऊन्ड आणि लाईट शो पयर्टकांना विशेष आकर्षणाचे केंद्र बनणार आहे.
 
 
 
काही योजनेसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात कशी मदत होईल यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. मीरपूर, अयोध्येत ६१ हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यासाठी रु.४४७ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तेथे ग्रंथालय, म्युझियम आणि पर्यटकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
 
 
 
 
अयोध्येत पर्यटन स्थळाप्रमाणे विकसित करण्यासाठी रु.८५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. अद्ययावत तुलसी स्मारक भक्तांसाठी रु.१० करोडची तरतूद करण्यात आली आहे. अयोध्या नगरीच्या प्रवेश द्वारावर भक्तांसाठी २५१ मीटर उंच प्रतिमेचे दर्शन होईल. या प्रतिमेच्या निर्मितीसाठी रु. ४५० कोटीची मंजुरी देण्यात आली आहे.
 
 

Ayodhya_5  H x  
 
 
 
 
उत्तर प्रदेश सरकारने भव्य राममंदिरसोबत अत्यंत सुविधाजनक, आकर्षक पर्यटन स्थळाप्रमाणे अयोध्येचा विकास करणार आहे. अद्ययावत नगराचे निर्माण मंदिर निर्माणासोबत होणार असल्याने स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्याच बरोबर अनेक रोजगार, धंदे, विकसित होणार असल्याने हजारो युवकांना रोजगार मिळतील. टुरीस्ट गाईड, ऑटोरिक्षा मिळण्याची संधी आहे.
 
 
 
केवळ भारतातून नाही तर संपूर्ण जगातील प्रवासी येथे येऊ शकतील अशा प्रकारची तयारी करण्यात येत आहे. परदेशातील लाखो भारतीय श्रद्ध-ाळु आणि पर्यटक येतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात टुरीझम वाढणार आहे. भारत सरकारचा पर्यटन विभाग, मंत्रालय, यासाठी योजनाबद्दरितीने काम करीत आहे. आणि राज्य सरकारला पूर्ण मदत करीत आहे. विदेशी मुद्रा भारतात जास्त प्रमाणात येईल अशी आशा सरकार बाळगत आहे. २०२४ ला मंदिर निर्माणानंतर जर रोजच्या रोज १ लाख प्रवासी आणि भक्त अयोध्येत येतील त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती किमान १ हजार रु. खर्च करेल तर अयोध्येत रोज १० कोटी रु. आणि वर्षाचे ३५० ते ४०० कोटी रुपयांची आवक होईल.
 
 
 
 
एका धार्मिक विवादास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भव्य पर्यटन स्थळ विकसित करुन अयोध्येस उत्तर प्रदेश सरकार आणि भारत सरकार एक मजबुत आर्थिक केंद्र बनण्याकडे वाटचाल करीत आहे. जगात याची नोंद होत आहे. अयोध्येचे राममंदिर विकासाचा नवा पायंडा रचत आहे. सर्वांवर प्रभु रामाची कृपा सदैव राहो ही शुभकामना.
 
- कमलेश शहा
@@AUTHORINFO_V1@@