राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा पोलीसांवर जीवघेणा हल्ला! कारवाई होणार का ?

    25-Aug-2020
Total Views | 226
NCP _1  H x W:
 
 
 
 
 
ठाणे : राष्‍ट्रवादीचे मुंब्रा विधानसभा आमदार व राज्‍याचे गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या बंगल्‍यावर मारहाण झालेल्‍या अनंत करमुसे यांना अद्याप न्‍याय मिळत नसतांना राष्‍ट्रवादीच्‍या शहर चिटणिसाने थेट पोलिसांवर हल्‍ला केल्याचा धक्कादायक प्रकार मुंब्रा येथे घडला आहे. मुंब्रा येथील पोलिस उपनिरीक्षक सचिन सरडे यांच्‍यावर हल्‍ला झाल्यानंतर अत्‍यंत दबाव असतांना अखेर मुख्‍य आरोपी मनोज कोकणे याच्यासह सात कार्यकर्त्‍यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
 
 
 
कोरोना काळात कायदा सुव्‍यवस्‍थेची काळजी घेत असतांना कर्तव्‍यावर असलेल्‍या मुंब्रा येथील पोलिस उपनिरिक्षक सचिन सरडे यांच्‍यावर राष्‍ट्रवादीच्‍या शहर चिटणिसाने आपल्‍या इतर साथीदारांसह धक्‍काबुक्‍की करत शासकीय कामात अडथळा आणण्‍याचा प्रयत्‍न केला. पोलिसांवरील या हल्‍यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. भाजपासह विविध पक्ष संघटनांनी या भ्‍याड हल्‍याचा निषेध करत हल्‍लेखोरांच्‍या अटकेची मागणी केली. अखेर पोलिसांवर दबाव असतांना देखील या प्रकरणात कोकणे याच्‍यासह सात कार्यकत्‍यांना अटक करण्‍यात आली आहे.
 
 
 
त्‍यांच्‍यावर हल्‍ला व शासकीय कामात अडथळा आणल्‍याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसचा शहरचिटणिस असलेल्‍या कोकणे यांच्‍यावर विविध पोलिस स्‍टेशनमध्‍ये यापुर्वी देखील गुन्‍हे दाखल आहेत. वडाळा टी टी, माटुंगा, कळवा तसेच मुंब्रा पोलिस स्‍टेशनमध्‍ये विविध गुन्‍हे दाखल आहेत. मात्र तरिही त्‍याच्‍यावर आत्‍तापर्यंत कार्यवाही करण्‍यात आली नव्‍हती आता मात्र थेट पोलिसांवरच हल्‍ला झाल्‍यानंतर कोकणे यांच्‍या मुस्‍क्‍या पोलिसांनी आवळल्‍या.
 
 
 
या प्रकरणात कुणीही पोलिस अधिकारी माहिती देण्‍यास तयार नाही इतका दबाव त्‍यांच्‍यावर आहे. हल्‍लेखोरांच्‍या मोबाईलचा डेटा घेऊन या हल्‍यामागेचा बोलविता धनी कोण आहे याचा तपास देखील व्‍हावा अशी मागणी केली जात आहे. सुशांत सिंह प्रकरणात आमचा मुंबई पोलीसांवर संपूर्ण विश्वास आहे, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121