दिलासादायक : मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Aug-2020
Total Views |
Corona_1  H x W

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ!


मुंबई : मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी वाढत असून २४ दिवसांपूर्वी दिवसांवर असलेला रुग्ण दुपटीचा कालावधी आता ८७ दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर ही ७६ टक्क्यांवरुन ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे.


कोरोना नियंत्रणात आणण्यात पालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे पालिकेला यश येत आहे. मुंबईत रोज एक हजारांच्या घरात रुग्ण आढळत असले तरी कोरोना कोविड सेंटर, पालिकेसह खासगी रुग्णालयात उपलब्ध केलेल्या खाटा यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होत आहे. सध्या कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याने पालिकेसह कोरोना कोविड सेंटर मधील खाटा रिक्त पडल्या आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाचा कोरोना विरोधातील लढा यशस्वी होत असल्याने रुग्णदुपटीचा कालावधी वाढत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचा दर ही वाढत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.


३१ जुलैला रुग्ण दुपट्टीचा कालावधी ७६ दिवसांवर पोहोचला होता. तर यात २४ दिवसांत वाढ होऊन रुग्ण दुपट्टीचा कालावधी आता ८७ दिवसांवर पोहोचला आहे. तर ३१ जुलैला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के होते. मात्र आता रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे.


या २४ दिवसांत चाचण्यांचे प्रमाण दोन लाखांनी वाढले असून ३१ जुलैपर्यंत ५ लाख २६ हजार ९८२ चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात वाढ होऊन २४ ऑगस्टपर्यंत ७ लाख ९ हजार ५८३ चाचण्या करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.



@@AUTHORINFO_V1@@