नेतृत्वबदल नाहीच ! काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम

    24-Aug-2020
Total Views |

sonia gandhi _1 &nbs



नवी दिल्ली : काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक संपली असून सोनिया गांधी तूर्तास हंगामी अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. पुढच्या ६ महिन्यात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. सोनिया गांधींना मदतीसाठी ४ सदस्य कमिटी बनवणार असून जी दैनंदिन कामकाजात मदत करणार आहे.


सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्षे पूर्ण झाल्याने नव्या अध्यक्ष निवडीची चर्चा सुरु झाली होती. अशातचं पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल जागृत करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिण्याचं धाडस दाखवलं. त्यामुळे अधिकचं गुंता निर्माण झाला होता. मात्र, अखेर सोनिया गांधी यांचीच ६ महिन्यांसाठी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यात नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून केलेली नेतृत्व बदलाची मागणी, सोनिया गांधींनी पद सोडण्याची व्यक्त केलेली इच्छा, राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास दिलेला नकार आणि कार्यकारी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होऊनदेखील हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम आहेत.