पुछता हैं भारत...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2020   
Total Views |

pravin tarde_1  


भाऊ कदम यांना घरी गणपती बसवला म्हणून किंवा प्रवीण तरडेंनी संविधानावर गणपती बसवला म्हणून माफी मागायला लावणार्‍यांना एक प्रश्न आहे की, भाऊ कदम किंवा प्रवीण तरडे यांना संविधानाने दिलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य, श्रद्धा स्वातंत्र्य आहे की नाही? की अभिव्यक्तिस्वातंत्र्य केवळ संविधानाचे नाव घेऊन असंविधानिक विचार आणि कृती करणार्‍यांनाच आहे? पुछता हैं भारत...!



संविधान कोणत्याही एका धर्माचे, पंथाचे किंवा पंथातील एका गटाचे नाही. नुकतेच प्रवीण तरडेसंदर्भित घटनेने पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यांनी संविधानावर गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आणि मोठा गजहब झाला. संविधानाचा अपमान झाल्यापासून ते मनुस्मृतीवर गणपतीला बसवा ते माफी मागा नाहीतर होणार्‍या हिंसेला जबाबदार राहा, असा गदारोळ सुरू झाला. प्रवीण तरडेंच्या या संविधानात्मक गणरायामुळे खरेच संविधानाचा अपमान झाला का? प्रवीण तरडेंच्या गणपती बाप्पाला पाहून मला तरी वाटले की, भारतीय समाजाचा देव, धर्म संविधानाच्या पायावर आधारीत आहे. भारतीय समाजाच्या श्रद्धा, संस्कृती संविधानात्मक आहे. पण छे! काही लोकांना मात्र वाटले की, हा संविधानाचा अपमान आहे. अपमान कसा? असे विचारले तर नेहमीप्रमाणे हिंदू समाज हा देव, श्रद्धा यावर त्यांची अश्लाघ्य टीका सुरूच. बरं संविधानाच्या पानापानांवर रामायणातली स्मृतिचित्रे आहेत. संविधानाने सगळ्यांना सकारात्मक कृती, विचारस्वातंत्र्य आहे दिले आहे. संविधानाने सगळ्यांना आपल्या श्रद्धा जपण्याचा, विचार जपण्याचा अधिकार दिला आहे, हे तरी यांना मान्य आहे का? या असल्या लोकांची संवेदनशीलता इतकी भूसभुशीत आहे की, संविधानातला ‘स’ जरी उच्चारला तरी यांना झटके येतात. बरं! हे संविधानाबद्दलचे प्रेम म्हणावे? आदर म्हणावा? तर छे! असे मुळीच नाही. कारण, या लोकांना संविधानाबद्दल प्रेम असते, आदर असता तर ते सगळ्याच प्रसंगात सारखे असते. पीडीपीच्या एका नेत्याने संविधानाची प्रत पूजली नव्हती तर फाडली होती. पण त्यावेळी यापैकी कुणालाही वाटले नाही की, ‘संविधान खतरे मैं हैं’ किंवा संविधानाचा अपमान झाला. संविधानाच्या देशकल्याणी कलमांचा चुकीचा अन्वयार्थ लावून समाजाला तोडणारे आज खरे देशाचे शत्रू आहेत. मात्र, या शत्रूंनी संविधानाचा अपमान केला, असे कोणी म्हणताना दिसत नाही. असो, भाऊ कदम यांना घरी गणपती बसवला म्हणून किंवा प्रवीण तरडेंनी संविधानावर गणपती बसवला म्हणून माफी मागायला लावणार्‍यांना एक प्रश्न आहे की, भाऊ कदम किंवा प्रवीण तरडे यांना संविधानाने दिलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य, श्रद्धा स्वातंत्र्य आहे की नाही? की अभिव्यक्तिस्वातंत्र्य केवळ संविधानाचे नाव घेऊन असंविधानिक विचार आणि कृती करणार्‍यांनाच आहे? पुछता हैं भारत...!



फालतु प्रश्न विचारू नका...!



“मुंबईतील कोविड सेंटरला मनुष्यबळ पुरविण्याचे काम अनेक कंपन्यांनी केले आहे. त्यात माझ्या मुलाचीही एक कंपनी आहे. काम मिळविणे हा त्याचा हक्क आहे,” असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. होय! मुंबईतले कोविड सेंटरचे काम मिळवण्याची योग्यता महापौरांच्या मुलाकडेच असणार. कारण, कोविड सेंटरचेच नव्हे तर कोणतेही कंत्राट मिळवण्याची योग्यता ही केवळ आणि केवळ नेता, अभिनेता किंवा गुंडपुंड यांच्याकडे किंवा त्यांच्या नातेवाईकांकडेच आहे, हे उघड सत्य आहे. मुंबई महानगरपालिकेची कंत्राटे कुणाला मिळालीत, याचा मागोवा घेतला तर हे चटकन जाणवेल की, सामान्य माणसांसाठी ही कंत्राटं नाहीतच. साधी वस्ती सफाईची कंत्राटे पाहा. सर्वपक्षीय नगरसेवकांनी ही कंत्राटे आपापसात वाटून घेतली की काय, असेच वाटते. म्हाडाचे सार्वजनिक हॉल असतात. त्याचे नियमन करण्याचे कंत्राट पाहा. त्याचे नियमनही केवळ राजकीय पक्षाशी संबंधित नातेवाईकच करू शकतात.आता कोविड सेंटर आले. अर्थात, त्याचेही नियमन आणि सर्व व्यवस्था तुमच्या-आमच्यासारखे लोक करूच शकत नाहीत. ते करणार कोण, तर संधीसाधू राजकारण्यांचे नातेवाईक. ज्यांचे मत असते ‘अपना काम बनता ** मे जाये जनता.’ कोरोना काळात कोविड सेंटर हा कळीचा आणि वादग्रस्त मुद्दा बनला आहे. ज्यांनी या कोविड सेंटरमध्ये ‘क्वारंटाईन’ राहण्याचा अनुभव घेतला आहे, त्यांचा एकदा मुक्त वेबिनार घेतला, संवाद प्रकाशित केला तर प्रशासनाचे डोळे उघडतील आणि डोकेही ठिकाणावर येईल. कारण, जनतेच्या सोईसाठी कोविड सेंटरची रचना, निर्मिती केली असा आव आणत असताना सामान्य जनता आपल्याबद्दल काय विचार करते, हे त्यांना समजेल. पण यातही मुद्दा असा आहे की, प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्य आणि राजकारणातील भ्रष्टाचाराचा मलिदा खाणारे तक्षक यांना जनतेचे काही पडलेले नाही. सेवा करण्यासाठी राजकारण नाही असे त्यांचे ठाम मत आहे. राजकारण कशासाठी तर सात पिढ्यांचा उद्धार करण्यासाठी. हे तत्त्व, ही संकल्पना त्यांनी श्वासामध्ये रूजवली आहे. त्यामुळे महापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरचे कंत्राट का? किंवा आदित्य ठाकरेच ‘पद्म पुरस्कार’ समितीचे अध्यक्ष का? हे प्रश्न फालतु आहेत. समजले का?
@@AUTHORINFO_V1@@